Akola Railway : काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, तातडीने रेल्वे थांबवण्याची मदत

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, याची प्रचिती आज अकोला रेल्वे स्टेशनवर आली. दुपारी साडेबारा वाजता भुवनेश्वरवरून लोकमान्य टर्मिनसकडे जाणारी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर थांबली होती. आणि लगेचच शिर्डीसाठी निघालेले शरद साहू आणि सौरभ साहू हे पिता-पुत्र पाणी घ्यायला खाली उतरले. त्यांचं पाणी घेईपर्यंत गाडी सुरू झाली आणि पिता-पुत्र पळत फलाटावर आले. यात दुर्दैवाने पिता शरद साहू रेल्वे आणि फलाटाच्या मधल्या जागेतून रूळावर पडले. तर मुलगा फलाटावर फेकला गेला. मात्र, आरपीएफचे पोलीस निरीक्षक युनूस खान यांच्या सतर्कतेमुळे दोघांचेही प्राण वाचले… त्यांनी तातडीने रेल्वे थांबवण्याची मदत केली.</p>

[ad_2]

Related posts