Record of Indias defense exports in 2023-24 Exports at Rs 21083 crore Business marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Record defense exports : भारतीय संरक्षण क्षेत्रासाठी आनंदाची बातमी आहे. इतिहासात प्रथमच भारतीय संरक्षण क्षेत्रानं विक्रमी निर्यात (Record defense exports) केलीय. मागील आर्थिक वर्षीच्या तुलनेत यावर्षी संरक्षण निर्यातीत 32.5 टक्क्यांची वाढ झालीय. भारताने प्रथमच 21 हजार कोटींचा टप्पा पार केला आहे. यात खाजगी क्षेत्राचे योगदान 60 टक्के, तर संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांचे योगदान 40 टक्के आहे. ही वृद्धी भारतीय संरक्षण उत्पादने आणि तंत्रज्ञानाच्या जागतिक मान्यतेचे  प्रतिबिंब आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्वीटरवर संरक्षण निर्यातीच्या संदर्भातील माहिती दिली आहे. हा नवा टप्पा पार केल्याबद्दल त्यांनी  सर्व संबंधितांचे अभिनंदन केलं आहे.

गेल्या 10 वर्षांत संरक्षण निर्यातीत 31 पटीनं वाढ

आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये संरक्षण निर्यातीने विक्रमी 21,083 कोटी ( सुमारे 2.63 अब्ज अमेरिकन डॉलर्स) रुपयांचा उच्चांक गाठला आहे. जी गेल्या आर्थिक वर्षातील 15,920 कोटी रुपयांच्या संरक्षण निर्यातीच्या तुलनेत 32.5 टक्क्यांनी अधिक आहे. आर्थिक वर्ष 2013-14 च्या तुलनेत गेल्या 10 वर्षांत संरक्षण निर्यात 31 पटीने वाढल्याचे या ताज्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. संरक्षण उद्योग, संरक्षण  क्षेत्रातील खासगी कंपन्या  आणि सार्वजनिक उपक्रमांनी  सर्वोच्च संरक्षण निर्यात साध्य करण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले आहेत.  या आकडेवारीत खासगी क्षेत्र आणि संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक  उपक्रमांचे योगदान अनुक्रमे 60 टक्के आणि 40 टक्के आहे.

कोणत्या कालावधीत किती निर्यात?

आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये संरक्षण निर्यातदारांना जारी करण्यात आलेल्या निर्यात परवान्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मधील 1,414 निर्यात परवान्यांच्या तुलनेत 2023-24 मध्ये ही संख्या 1,507 वर पोहोचली आहे. दोन दशकांची तुलनात्मक आकडेवारी म्हणजे 2004-05 ते 2013-14 आणि 2014-15 ते 2023-24 या कालावधीत संरक्षण निर्यातीत 21 पट वाढ झाल्याचे दिसून येते.  2004-05 ते 2013-14 या कालावधीत एकूण संरक्षण निर्यात 4,312 कोटी रुपये होती. जी 2014-15 ते 2023-24 या कालावधीत 88,319 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

राजनाथसिंह यांनी ट्वीटमध्ये नेमकं काय म्हटलंय?

राजनाथ सिंह यांनी संरक्षण क्षेत्रातील निर्यातीसंदर्भात माहिती दिलीय. भारताच्या संरक्षण क्षेत्रानं अभूतपूर्व उंची गाठली आहे. यामध्ये नवीन विक्रम केल्याचे राजनाथ सिंह म्हणाले. स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच भारताने संरक्षण निर्यातीत 21000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात भारताची संरक्षण निर्यात 21,083 कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत  निर्यातीत वाढ झाली आहे. ही वाढ 32.5 टक्क्यांची एवढी मजबूत आहे. 

महत्वाच्या बातम्या:

अदानी समूहानं एक मोठा निर्णय, संरक्षण क्षेत्रात करणार 3000 कोटींची गुंतवणूक

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts