Asia Cup 2023 Will Now Be Played According To The Hybrid Model ; Asia Cup आता हायब्रीड मॉडेलनुसार ICC खेळवणार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : आशियाच चषक स्पर्धा आता हायब्रीड मॉडेलनुसार होणार असल्याचे आयसीसीने नुकतेच जाहीर केले आहे. त्यामुळे आता बऱ्याच काळापासून ही रखडलेली स्पर्धा नेमकी कशी आणि कुठे होणार, याची माहिती आयसीसीने दिली आहे.
आशिया चषकाचे हायब्रीड मॉडेल आहे तरी काय, जाणून घ्या…
पाकिस्तानने सुरुवातीस ‘हायब्रीड मॉडेल’ सादर करताना संयुक्त अरब अमिरातीस सहयजमान केले होते. मात्र, तेथील कडक उन्हाचा त्रास होईल, अशी भूमिका श्रीलंका आणि बांगलादेशने घेतली. या परिस्थितीत संपूर्ण स्पर्धेचे संयोजन करण्याची तयारी श्रीलंकेने दाखवली. त्यास बांगलादेश आणि भारताचीही साथ लाभली. मात्र, पाकिस्तानने आता श्रीलंकेस सहयजमान होण्यास तयार केले आहे. या स्पर्धेत एकूण तेरा लढती होतील. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान आणि नेपाळ एका गटात, तर श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान दुसऱ्या गटात आहेत. दोन्ही गटांतील अव्वल चार संघ सुपर लीगसाठी पात्र ठरतील. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात या स्पर्धेत एकूण तीन लढती होण्याची शक्यता आहे.

नव्या प्रस्तावानुसार पाकिस्तानात स्पर्धेतील किमान चार आणि जास्तीत जास्त पाच लढती होतील. भारतीय संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरल्यास विजेतेपदाची लढत श्रीलंकेत होईल; अन्यथा निर्णायक लढत पाकिस्तानात होणार आहे. ‘या स्पर्धेतील पाकिस्तानातील लढती सर्वांत सुरक्षित मानल्या जात असलेल्या लाहोरमध्येच होतील,’ अशी ग्वाही पाकिस्तान बोर्डाने दिल्याचे समजते. या नव्या स्वरूपानुसार स्पर्धेचा कार्यक्रम लवकरच जाहीर होईल, असे सूत्रांनी सांगितले.

भारताने पाकिस्तानात आशिया कप घेण्यासच विरोध केल्यामुळे पाकिस्तान आक्रमक झाले होते. त्यांनी वर्ल्ड कपबाबत बहिष्काराचा विचार असल्याचे सांगितले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) पदाधिकाऱ्यांनी नुकतीच पाक बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी वर्ल्ड कपमधील पाकचा सहभाग निश्चित केला. मात्र, त्याच वेळी पाकने त्यामोबदल्यात आशिया कपमधील काही लढती पाकिस्तानात घेण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) मान्यता मिळवण्याची अट घातली होती. बीसीसीआयने आयसीसीची मध्यस्थी मान्य केली असल्याचे समजते.

धोनीला वाढदिवसानिमित्त आंध्र प्रदेशच्या चाहत्यांचे खास गिफ्ट; उभारला 41 फुटांचा कटआऊट

आशिया चषक स्पर्धा आता हायब्रिड मॉडेलनुसार होणार आहे.

[ad_2]

Related posts