Cyclone Biparjoy Live Location Tracker Know When Will It Hit In India

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Biparjoy Live Tracker: अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय वादळाने (Biparjoy Cyclone) अत्यंत धोकादायक चक्रीवादळाचं स्वरुप धारण केलं आहे. हवामान खात्याच्या ताज्या अपडेटनुसार, हे चक्रीवादळ गुजरातच्या जाखाऊ बंदरापासून सुमारे 200 किलोमीटर अंतरावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 15 जूनच्या संध्याकाळपर्यंत ते मांडवी, सौराष्ट्र, कच्छ आणि जखाऊ बंदराजवळील पाकिस्तानच्या किनार्‍यांमधून जाईल. दरम्यान, एनडीआरएफसह सर्व मदत आणि बचाव पथकं हाय अलर्टवर आहेत. सागरी किनाऱ्यांवर सर्व पथकं तैनात करण्यात आली आहेत. बिपरजॉय वादळामुळे गुजरातच्या किनारपट्टीवर 150 किमी/ताशी वेगाने वारे वाहू शकतात.

बिपरजॉय वादळ सध्या कुठे?

बिपरजॉय वादळ हे सध्या भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान आहे. गुजरातमधून ते पुढे पाकिस्तानमध्ये सरकण्याची संभाव्यता व्यक्त करण्यात येत आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, हे वादळ किनारपट्टीवर आदळण्यापूर्वी किंचित कमकुवत होऊ शकतं, परंतु ते अजूनही अत्यंत भयंकर रुप धारण करुन पुढे सरकत आहे. यादरम्यान अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यांचा प्रभाव दिसून येईल, तसेच समुद्रात 2 ते 3 मीटर उंचीच्या लाटा उसळतील. 6 जून ते 7 जून दरम्यान आग्नेय अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ तयार झाले आणि 11 जूनपर्यंत त्याचे तीव्र वादळात रूपांतर झाले. अनेक वेबसाइट्स आहेत, ज्यावर तुम्ही या तीव्र चक्रीवादळाचे लाइव्ह लोकेशन (Live Location) पाहू शकता.

झूम अर्थ वेबसाइटच्या सहाय्याने पाहू शकता बिपरजॉयचे सध्याचे ठिकाण

झूम अर्थ

झूम अर्थ (Zoom Earth) वेबसाइटच्या मदतीने तुम्ही चक्रीवादळ बिपरजॉयची प्रत्येक क्रियाकलाप सहजपणे पाहू शकता. येथे तुम्ही वादळाच्या थेट ठिकाणासह सॅटेलाइट फोटो आणि अॅनिमेशन देखील पाहू शकता. याशिवाय, ही वेबसाइट तुम्हाला या वादळाचा पूर्वीचा मार्ग देखील दाखवते, तसेच वादळ कोणत्या मार्गावरून पुढे जाईल हे देखील सांगते.

रेनव्ह्यूअर वेबसाइट

तुम्ही रेनव्ह्यूअर (Rainviewer) वेबसाइटवर वादळाची वाटचाल तपासू शकता. यामध्ये त्या ठिकाणांचा तपशीलही मिळणार आहे, ज्या ठिकाणी वादळाने भयंकर विध्वंस केला आणि पुढे कोणत्या भागात हे वादळ पोहोचणार आहे, याचीही माहिती मिळणार आहे.

मुंबईवर देखील वादळाचा परिणाम

बिपरजॉय चक्रीवादळ (Cyclone Biparjoy) हे गुजरातमध्ये धडकलं आहे. या चक्रीवादळाचा काहीसा परिणाम मुंबईतील (Mumbai) वातावरणावर सुद्धा पाहायला मिळतोय. मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर समुद्र खवळलेला आहे. किनाऱ्यावर उंच उंच लाटा उसळत आहेत. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबई चौपाट्या काही वेळापुरत्या बंद करण्यात आल्या आहेत. चौपाटींवर येणाऱ्या लोकांना पोलिसांकडून बाहेर जाण्याचा आवाहन केलं जात आहे. शिवाय जीवरक्षकही चौपाट्यांवर खबरदारीचा उपाय म्हणून तैनात आहेत.

हेही वाचा:

Cyclone Biparjoy: बिपरजॉय वादळ किती भयंकर? समोर आली सॅटेलाइट दृश्यं; पाहा…

[ad_2]

Related posts