लग्नात कन्यादान का करतात? श्रीकृष्ण काय सांगतात? हे मुलीचं दान नसून…| Marriage Rituals Why do kanyadan in marriage What does Shri Krishna say This is not a girl donation

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Marriage Rituals Facts in Marathi : आपण लहानपणापासून घरात लग्नाबद्दल एक वाक्य हमखास ऐकतो. लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात. कोणाचं लग्न कोणाशी होणार हे सगळं विधीलिखित असतं असं म्हणतात. हिंदू धर्मात लग्नासंदर्भात अनेक विधी असतात. प्रत्येक विधीमागे शास्त्रीय कारण सांगण्यात आलंय. हळद, मेहंदी, सप्तपदी (Saptapadi) आणि कन्यादान (Kanyadaan) असे अनेक विधी असतात. या धार्मिक विधीनंतर त्या जोडप्याचा लग्नाला समाज मान्यता मिळती असा विश्वास आहे. (Marriage Rituals Why do kanyadan in marriage What does Shri Krishna say This is not a girl donation)

काळ बदलला आहे, आज लग्न म्हणजे भव्यदिव्य असा एक ग्रॅण्ड असा इव्हेंट असतो. लग्नातील प्रत्येक विधीचा मोठ्या असा सोहळा केला जातो. तर या लग्नातील एक विधी असतो तो म्हणजे कन्यादान. आजच्या पिढीला या कन्यादान शब्दाला विरोध आहे. पालक आपल्या पोटच्या गोळ्याला असं वस्तू असल्यासारखं दान करणार का? असा प्रश्न ही पिढी विचारते. 

त्यात नुकताच एका प्रकरणात अलाहाबाद हायकोर्टाने असा निर्णय दिला आहे की, हिंदू विवाह कायद्याअंतर्गत (Hindu Marriage Act) लग्नात कन्यादानाची गरज नसून सप्तपदीला महत्त्व आहे. पण श्रीकृष्ण कन्यादानाबद्दल काय सांगतात आणि कन्यादान म्हणजे नेमकं काय? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. 

लग्नात कन्यादान का करतात? 

फेसबुकवर ओमकार विलास सावंत यांनी कन्यादानाबद्दल समज आणि गैरसमजाबद्दल निरासन केलंय. ते म्हणतात की, अनेकांना कन्यादान या शब्दावर आक्षेप आहे. ते म्हणतात की, कन्यादान हे मुलीचे दान नसतं. लग्नाच्या वेळी आपल्या मुलीचा हात वराकडे सोपविण्याचा पद्धतीला कन्यादान असं म्हटलं जातं. लग्नातील या विधीद्वारे वडील आपल्या मुलीची जबाबदारी तिच्या पतीवर सोपवतात आणि तिच्या नवीन आयुष्यासाठी आशीवार्द देतात. 

श्रीकृष्ण काय सांगतात? 

भगवान श्रीकृष्णाने अर्जुन आणि सुभद्रा यांचा गंधर्व विवाह लावला होता. त्यावेळी कृष्णाचा मोठा भाऊ बलकाम यांनी या लग्नाला विरोध केला. भगवान बलराम म्हणाले होते की, सुभद्राचे कन्यादान झाले नाही आणि लग्नात कन्यादानाचा विधी जोपर्यंत होत नाही. तोपर्यंत तो विवाह पूर्ण मानला जात नाही. 

तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले की, मुलीचे दान करायला ती कोणताही प्राणी नाही. कन्यादानाचा योग्य अर्थ मुलीचे आदान असा आहे, मुलीचे दान नाही. 

लग्नाच्या वेळी मुलीची जबाबदारी नवरदेवाच्या हाती सोपवताना वडील सांगतात की, आजपर्यंत मी माझ्या मुलीचे पालनपोषण केले आणि तिची जबाबदारी पार पाडली. आजपासून मी माझी मुलगी तुमच्या स्वाधीन करतो. यानंतर वधूची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडण्याचे वचन नवरा मुलगा देतो. 

भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, मुलगी ही देवाने दिलेली देणगी आहे आणि देवाने दिलेल्या देणगीचे कधीही दान होत नाही. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

Related posts