Tushar Shewale activists angry against Dr Shobha Bachhav in Malegaon Dhule Lok Sabha Election 2024 Maharashtra Politics Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Dhule Lok Sabha Election 2024 : धुळे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून (BJP) पुन्हा एकदा डॉ. सुभाष भामरे (Subhash Bhamre) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यांच्या विरोधात तोडीस तोड उमेदवाराचा शोध काँग्रेसकडून (Congress) सुरु होता. काँग्रेसकडून काल माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव (Dr Shobha Bachhav) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. 

डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवारीचा जोरदार विरोध केला आहे. धुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर (Sham Saner) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर नाशिक जिल्हा काँग्रेसचे ग्रामीण अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे (Dr Tushar Shewale) यांनीही राजीनामा (Resignation) दिला. 

शोभा बच्छाव यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी 

या पार्श्वभूमीवर डॉ. शोभा बच्छाव या नाराज डॉ. तुषार शेवाळे यांच्या मालेगाव (Malegaon) येथील कार्यालयात भेटीसाठी आलेल्या असताना आयात उमेदवार चालणार नाही. शोभा बच्छाव परत जा, अशी जोरदार घोषणाबाजी शोभा बच्छाव यांच्यासमोर कार्यकर्त्यांनी केली.

डॉ. शोभा बच्छाव यांना माघारी फिरण्याची वेळ 

डॉ. तुषार शेवाळे यांना उमेदवारी द्या. तुमची उमेदवारी रद्द करा, अशी आग्रही मागणी करत संतप्त कार्यकर्त्यांनी डॉ.  शोभा बच्छाव यांना चांगलेच धारेवर धरले. कार्यकर्त्यांचा रोष पाहून डॉ. शोभा बच्छाव यांना आल्या पाऊली माघारी फिरावे लागले. यावेळी डॉ.शोभा बच्छाव व त्यांचे पती डॉ. दिनेश बच्छाव (Dinesh Bachhav) यांनी कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र याबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला. डॉ. बच्छाव यांची उमेदवारी रद्द करून डॉ. शेवाळे यांना उमेदवारी देण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली आहे. आता काँग्रेसकडून याबाबत काय निर्णय घेतला जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

ठाकरे गटातील इच्छुकांना झटका अन् काँग्रेसमधील नाराजीनाट्य संपेना; धुळ्यात राजकीय चित्र नेमकं आहे तरी काय?

पक्षाच्या एकनिष्ठतेचे बक्षीस! धुळ्यातून सुभाष भामरेंविरोधात लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या शोभा बच्छाव आहेत तरी कोण?

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts