RCB IPL 2024: आरसीबी अंतिम सामना खेळणार…8 वर्षे जुन्या इतिहासाची  पुनरावृत्ती होणार, नेमकं समीकरण काय?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
RCB IPL 2024: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ (Royal Challengers Bengaluru) आयपीएल 2024 च्या हंगामात नवीन नाव आणि नवीन जर्सीसह मैदानात उतरला. मात्र तरीही विराट कोहलीच्या संघाचे नशीब बदलले नाही. आतापर्यंत सहापैकी पाच सामन्यात पराभव झाला आहे. परंतु असे असताना देखील आरसीबीचा संघ आयपीएलच्या अंतिम सामन्यात दाखल होऊ शकतो, असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. कोणत्या समीकरणानूसार आरसीबीचा संघ अंतिम फेरीत दाखल होऊ शकतो, जाणून घ्या…

आरसीबीचा संघ 2016 मध्ये अंतिम फेरीत पोहचला होता. तेव्हा देखील आरसीबीची यंदासारखीच परिस्थिती होती. मात्र आरसीबीचा संघ जोरदार पुनरागमन करत अंतिम फेरीत दाखल झाला होता. चाहत्यांना या हंगामातही असाच चमत्कार अपेक्षित आहे आणि त्यामुळेच आरसीबी अंतिम फेरीत पोहोचेल असा दावा केला जात आहे.

2016 मध्ये काय झालं होतं?

आयपीएल 2016 मध्ये आरसीबीने पहिल्या सातपैकी पाच सामने गमावले. मात्र, यानंतर विराट कोहलीच्या संघाने उर्वरित सात सामन्यांत सहा सामने जिंकले आणि गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहचले होते. या हंगामातही आरसीबीने सहा सामन्यांत केवळ एकच सामना जिंकला आहे. अशा परिस्थितीत हा संघ पुन्हा एकदा 2016 सारखा चमत्कार करून अंतिम फेरीत प्रवेश करेल, असा दावा चाहते करत आहेत.

अजूनही वेळ गेलेली नाही…

सलग पाच पराभवानंतर मुंबई इंडियन्सने जेतेपद पटकावले होते. अशा परिस्थितीत आरसीबीसाठी रस्ते अद्याप संपलेले नाहीत. हा संघ येथून पुनरागमन करू शकतो. आरसीबीने या हंगामातील उर्वरित आठपैकी सर्व किंवा सात सामने जिंकले तर ते प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतात. आयपीएलच्या इतिहासात आरसीबीला एकदाही विजेतेपद मिळालेले नाही. 2016 मध्ये हा संघ अंतिम फेरीत सनरायझर्स हैदराबादकडून पराभूत झाला होता.

गुणतालिकेत कोण-कोणत्या स्थानावर?

आयपीएलच्या या हंगामात आतापर्यंत सर्वोत्तम फॉर्ममध्ये असलेला राजस्थान रॉयल्स 8 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर कोलकाता नाइट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स 6-6 गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. KKR चा नेट रनरेट +1.528 आणि चेन्नईचा +0.666 आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स संघ प्रत्येकी 6 गुणांसह पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. हैदराबादचा निव्वळ नेट रनरेट +0.344 आणि गुजरातचा -0.637 आहे. त्याखालोखाल मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स 4-4 गुणांसह अनुक्रमे सातव्या, आठव्या आणि नवव्या स्थानावर आहेत. मुंबईचा नेट रनरेट -0.073 आणि पंजाबचा -0.196 आहे. त्यानंतर गुणतालिकेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तळाच्या 10व्या स्थानावर आहे. आरसीबी हा या हंगामातील एकमेव संघ आहे, ज्याने आतापर्यंत केवळ 1 विजय नोंदवला आहे. बंगळुरूने 6 सामने खेळले आहेत, ज्यात फक्त 1 सामना जिंकला आहे.

संबंधित बातम्या:

IPL 2024: नाव मोठं, लक्षण खोटं, महागड्या खेळाडूंनी वाट लावली, 17 कोटीच्या खेळाडूने तर लाज काढली!

दिल्लीचा विजय अन् 4 संघांचा क्रम बदलला;चेन्नईला सामना न खेळता फायदा झाला, पाहा IPL Points Table

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरसारखी दिसणारी ही मिस्ट्री गर्ल कोण?; पाहा Photo’s

[ad_2]

Related posts