Dilip Shanghvi News NO Ambani Adani Know Story Of Sun Pharma Founder Dilip Shanghvi Creates 15.65 Lakh Crore Net Worth Just Investing 10k Marathi News Business

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Business News : एक काळ असा होता की भारतात औद्योगिक घराणे म्हणजे टाटा-बिर्ला यांचं नाव घेतलं जायचं. आता अंबानी-अदानींना औद्योगिक घराणं म्हटलं जातं. परंतू, असे बरेच लोक उद्योगपती आहेत की, जे स्वतःच्या व्यवसायात लक्ष घालतात, तसेच मीडियापासून देखील दूर राहतात. आज आपण अशाच एका उद्योगपतीबद्दल माहिती पाहणार आहोत की, ज्याने 10,000 रुपयांपासून आपला व्यवसाय सुरू केला होता, तो आता 15.65 लाख कोटी रुपयांपर्यंत गेला आहे.

सन फार्मा सुरु करणारे दिलीप संघवी (Dilip Shanghvi) असं या उद्योगपतीचं नाव आहे. जे भारतातील 8 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती 15.65 लाख कोटी रुपये आहे. त्यांची कंपनी देशातील सर्वात मोठी फार्मास्युटिकल कंपनी आहे. त्याला ‘रिलेक्टंट बिलियनेअर’ या टोपण नावानेही ओळखले जाते. 

वडिलांकडून 10 हजार रुपये उसने घेऊन सुरुवात

दिलीप संघवी यांचा अब्जाधीश होण्याचा प्रवास 1982 मध्ये सुरू झाला. त्यांचे वडील कोलकात्यात औषध वितरक होते, पण दिलीपला काहीतरी मोठे करायचे होते. त्यांनी वडिलांकडून 10 हजार रुपये उसने घेऊन औषधे बनवायला सुरुवात केली. त्यांनी व्यवसाय चालवण्याचे कोणतेही औपचारिक प्रशिक्षण घेतले नव्हते. भवानीपूर महाविद्यालयातून त्यांनी वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केली आहे. आज सन फार्माचा व्यवसाय 100 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरलेला आहे. देशातील सर्वात मोठी फार्मास्युटिकल कंपनी असण्यासोबतच ती जगातील चौथी सर्वात मोठी जेनेरिक फार्मास्युटिकल कंपनी आहे. त्याचा महसूल 44,971 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

2016 मध्ये दिलीप सिंघवींचा ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मान

दिलीप सिंघवी यांनी सन फार्माला जागतिक बनवण्यासाठी अनेक मोठ्या कंपन्या ताब्यात घेतल्या. यामध्ये डेट्रॉईटची काराको फार्मा आणि इस्रायलची तारो फार्मा या कंपन्यांच्या नावांचा समावेश आहे. 2014 मध्ये, त्यांनी त्यांची सर्वात मोठी प्रतिस्पर्धी कंपनी रॅनबॅक्सी लॅबोरेटरीज देखील विकत घेतली होती. 2016 मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ सारख्या नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या:

फक्त 1 रुपयांपासून ‘या’ कंपनीने कमावला करोडोंचा नफा, जाणून घ्या सविस्तर माहिती 

[ad_2]

Related posts