Adobe Acrobat Completed 30 Years Of Service Know The Detail About Software Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Tech News : Adobe Acrobat या कम्प्युटर अॅप्लिकेशनला 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. जॉन वॉर्नाक आणि त्यांच्या टीमने 30 वर्षांपूर्वी पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट (PDF) आणि Adobe Acrobat चा शोध लावला. ज्यामुळे तुम्हाला तुमची महत्त्वाची माहिती किंवा कागदपत्रे पीडीएफ स्वरुपात उपलब्ध होतात. PDF मुळे डिजिटल प्रकाशन आणि ई-स्वाक्षरी सारख्या सुविधा सहज उपलब्ध होण्यास मदत होते. 2008 मध्ये Adobe ने PDF ही ओपन सोर्स ही प्रणाली जगासमोर आणली. 

Adobe Acrobat पेपर-टू-डिजिटल क्रांतीला योगदान देण्यास मदत केली आहे. PDF मुळे सर्व कंपन्यांसाठी त्यांची महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवण्यास मदत होते. Adobe Acrobat हे जागतिक स्तरावर वापरण्यात येणारे साधन आहे. तुम्ही तुमच्या डेस्कटॉपवर, वेब ब्राऊझरमध्ये, मोबाईलमध्ये आणि इतर अॅप्लिकेशन्समध्ये हे सॉफ्टेवअर घेऊ शकता. Adobe Acrobat ने दिलेल्या माहितीनुसार, 400 अब्जाहून अधिक लोकांनी Adobe मध्ये त्यांच्या PDF सुरु केल्या आहेत. तर 8 अब्ज लोकांनी इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल स्वाक्षरी व्यवहार केले आहेत. Adobe Scan हे iOS आणि Android जवळपास 2.5 अब्ज लोकांनी डाऊनलोड केले आहे. 

कागदपत्रे तपासण्यास किंवा ई-स्वाक्षरी तयार करण्यास Adobe Acrobat ची मदत 

बहुतेक उद्योजकांकडे किंवा कर्मचाऱ्यांकडे कामातून पुरेसा वेळ फारसा मिळत नाही. अशा वेळी Adobe  Acrobat त्यांना त्यांच्या मोबाईलवर त्यांची कागदपत्रे तपासण्यास किंवा ई-स्वाक्षरी तयार करण्यास मदत करते. काही कंपन्यांकडून असं सांगण्यात आलं की, Adobe Acrobat मुळे आम्ही आमच्या व्यवसायात डिजिटल वर्कफ्लो चालवण्यास सक्षम होतो. तसेच यामुळे आम्हाला आमचे कायदेशीर दस्तऐवज, खरेदी आणि विक्री केलेले करार यांसरख्या महत्त्वाच्या कामांचे देखील विश्लेषण करता येते. सध्या AI च्या काळामध्ये Adobe AI हे डिजिटल युगाचे भविष्य बनवत असल्याचं संस्थेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. 

लिक्विड मोडमध्ये वाचल्या जाणार्‍या PDF ची संख्या लाखोंच्या घरात

मोबाईमध्ये लिक्विड मोड हा देखील पर्याय Adobe Acrobat मध्ये उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामुळे दर महिन्याला लिक्विड मोडमध्ये वाचल्या जाणार्‍या PDF ची संख्या लाखोंच्या घरात असल्याचं देखील कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. Adobe Document Cloud चे मुख्य अधिकारी अभिज्ञान मोदी यांनी म्हटलं की, “सर्व कंपन्यांसाठी त्यांचे महत्त्वाचे दस्तऐवज ठेवण्यासाठी Adobe Acrobat ही महत्त्वाची भूमिका बाजवतं.” अलिकडेच जाहीर करण्यात आलेले PDF अॅक्सेसिबिलिटी ऑटो-टॅग API ही नवी सुविधा देखील सुरु आहे. यामुळे तुमच्या वेळेची आणि पैशाची बचत होण्यास देखील मदत होणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

YouTube वरुन पैसे कमावणं झालं सोपं; आता 1000 नाहीतर तर फक्त इतकेच हवे सबस्क्राइबर्स

[ad_2]

Related posts