Maharashtra Politics Shiv Sena UBT Uddhav Thackeray Speech Highlights At Shiv Sena Shibir Worli Mumbai Maharashtra

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shiv Sena Uddhav Thackeray Speech Highlights:  शिवसेना ठाकरे गटाचे आज वरळीमध्ये शिबीर पार पडले. या शिबिराला राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने या शिबिराचा समारोप झाला. आपल्या समारोपीय भाषणात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गट, भाजपवर सडकून टीका केली. गद्दारांचा फौजेचा नेतृत्व करण्यापेक्षा मूठभर निष्ठावंतचा नेतृत्व करू असे ठाकरे यांनी म्हटले. सरकार कसे चाललंय तर, ‘उठ सूट लुटालूट’ असं सरकार चाललं असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. 
 

> उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे: 

– गद्दारांच्या फौजेचा नेतृत्व करण्यापेक्षा मूठभर निष्ठावंतचा नेतृत्व करू 

– मुंबईचं महत्व कमी करण्याचा काम सुरू आहे. मुंबई तोडण्याचा काम जो करतील त्यांच्या देहाचे तुकडे तुकडे करू, असं बाळासाहेब म्हणाले होते.

– मी 23 जूनला पाटणाला चाललोय. आधी भाजपचे लोक मातोश्री वर येत होते आता सगळ्या पक्षाचे नेते येत आहेत. विरोधी पक्षाचे नेते एकत्र येतील का? पंतप्रधान उमेदवार कोण असेल? असे प्रश्न विचारले जातात. 

– आता ही एकजूट स्वातंत्रप्रेमीची होणार आहे. देशावर प्रेम असणाऱ्यांची एकजूट आहे. 

– फडणवीस यांची अवस्था म्हणजे ‘सांगताही येत नाही अन् सहनही करता येत नाही’ अशी झालीय…

– कर्नाटक सरकारने सावरकर यांचा धडा वगळला मला फडणवीस यांनी प्रश्न विचारला. सावरकर यांचा धडा गाळला याचा शिवसेना निषेध करते. जर तुम्ही देवेंद्रजी खरे सावरकर प्रेमी असाल तर देश बुडाखाली घेणाऱ्या नेत्यांचा धिक्कार करा!

– हिटलरने सत्ता आल्यानंतर लगेच छळछावणी सुरू केली नाही. त्याने छळ सुरू करत विरोधी पक्ष कमी केले. जनता जेव्हा शांत बघत होती तेव्हा हिटलर माजला. त्यानंतर दडपशाही सुरू केली. आपल्या देशाची स्थिती म्हणजे हिटलरशाहीकडे जातेय का? अशी स्थिती आहे. 

– अमित शाह मला 370 कलम रद्द केल्याबद्दल प्रश्न विचारता? तुम्हाला अदाणीचा प्रश्न विचारल्यावर बोबडी वळते. 370 कलम रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलींग…सहा वर्षानंतरही निवडणूक नाही.

– कर्नाटकमध्ये पंतप्रधान मोदींचा चेहरा कमी पडला मग बजरंगबली आणले मग पेटवली ना तुमची सत्तेची खुर्ची

– जर देश मजबूत हवा असेल तर सरकार स्थिर हवं 

– आता देशाचे तुकडे करतील का? अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

– यांचा गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा चालू आहे जी हुजूर जी हुजूर करतात

– मोहनजी तुम्ही आरएसएसचं हिंदुत्व काय आहे ते सांगा ? 

– समान नागरी कायदा आणा आमचा पाठिंबा आहे, पण या विषयावर लोकसत्तामध्ये आलेला अग्रलेख वाचा…हिंदूंना त्रास होणार का? हे आधी सांगा 

– राज्यकर्ते म्हणून समान कायदा आणा…आम्ही आरोप केले की ते झाकून ठेवायचे 

– बीएमसीची कुत्रा पकडण्याची गाडी असते…तसं भाजप करतंय…दुसऱ्या पक्षातील भ्रष्ट मानस दिसले की ते पकडतात 

– कमळाबाई हा भ्रष्ट जनता पार्टी झाला आहे

– मिंदे यांना भाजपने सांगितलं निवडणूक आधी काही हजार कोटी आणा यासाठी बीएमसीची लुटा लूट सुरू आहे

– भाजप आव्हान नाही, त्यांचा कारभार हे आव्हान आहे. लवकर सत्तेतून बाहेर काढू म्हणजे आपला देश स्वच्छ होईल 

[ad_2]

Related posts