News Arena India Survey On Western Maharashtra Political Situation Maharashtra Assembly Election News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

News Arena India Survey On Maharashtra Assembly Election: महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी अद्याप एक वर्ष बाकी असलं तरी राजकीय वातावरण मात्र आतापासूनच तापायला सुरूवात झाली आहे. त्यातच आता वेगवेगळे सर्वे येत असून कुणाची ताकद किती यावर भाष्य केलं जात आहे. न्यूज अरेना (News Arena India) या संस्थेने केलेला असाच एक सर्वे व्हायर होत असून त्यामध्ये भाजप राज्यात बहुमताने सत्ता स्थापन करणार असं सांगितलं आहे. भाजपला  123 ते 129 शिवसेना म्हणजे शिंदे गटाला 25, राष्ट्रवादी काँग्रेसला 55 ते 56, काँग्रेसला 50-53 तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला फक्त 17 ते 19 आणि इतर तसंच अपक्ष उमेदवारांना  12 जागा मिळतील असं भाकीत करण्यात आलंय. तर पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजप मुसंडी मारेल असंही सांगण्यात आलंय. पश्चिम महाराष्ट्राती 54 जागांपैकी राष्ट्रवादीला 23 जागा तर भाजपला 22-23 जागा मिळतील असं या सर्वेमध्ये सांगितलं आहे. तर काँग्रेसला केवळ 10 जागा तर शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावं लागणार आहे असंही सांगण्यात आलं आहे. 

हा कथित सर्वे कुणी आणि कधी केला, त्यासाठी सँपल साईज किती याचीही माहिती अजून सार्वजनिक करण्यात आलेली नाही, फक्त पब्लिक डोमेनमध्ये म्हणजे ट्वीटर हँडलवर प्रकाशित झालेल्या अंदाजाचं आमच्या वाचकांसाठी वृत्तांकन करणं एवढाच आमचा प्रयत्न आहे.

पश्चिम महाराष्ट्र (Western Maharashtra) (एकूण जागा 58)

भाजप (BJP) : 22-23
शिवसेना-एकनाथ शिंदे (ShivSena) : 1
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) : 23 
काँग्रेस (INC) : 9-10
शिवसेना (उद्धव ठाकरे) (ShivSena UBT) : 1
इतर (OTH) : 1 

 

कोल्हापूर (Kolhapur) – भाजप :2-3, शिवसेना  : 1, राष्ट्रवादी काँग्रेस : 4, काँग्रेस : 2-3

271. चंदगड (Chandgad) : राष्ट्रवादी काँग्रेस 
272. राधानगरी (Radhanagari) : राष्ट्रवादी काँग्रेस
273. कागल (Kagal) : राष्ट्रवादी काँग्रेस 
274. कोल्हापूर दक्षिण (Kolhapur South) : 50:50
275. करवीर (Karvir) : काँग्रेस 
276. कोल्हापूर उत्तर (Kolhapur North) : शिवसेना 
277. शाहूवाडी (Shahuwadi) : भाजप 
278. हातकणंगले (Hatkanangale (SC) : काँग्रेस 
279. इचलकरंजी (Ichalkaranji) : भाजप 
280. शिरोळ (Shirol) : राष्ट्रवादी काँग्रेस  

सांगली (Sangli) – भाजप : 4, राष्ट्रवादी काँग्रेस : 2, काँग्रेस : 2

281. मिरज (Miraj-SC) : भाजप 
282. सांगली (Sangli) : भाजप 
283. इस्लामपूर (Islampur) : राष्ट्रवादी काँग्रेस 
284. शिराळा (Shirala) : भाजप  
285. पळूस कडेगाव (Palus Kadegaon) : काँग्रेस 
286. खानापूर (Khanapur) : भाजपBJP
287. तासगाव (Tasgaon) : राष्ट्रवादी काँग्रेस 
288. जत (Jath) : काँग्रेस 

सातारा (Satara) – भाजप : 2. राष्ट्रवादी काँग्रेस  : 6

255. फलटण (Phaltan-SC) : राष्ट्रवादी काँग्रेस 
256. वाई (Wai) : राष्ट्रवादी काँग्रेस 
257. कोरेगाव (Koregaon) : राष्ट्रवादी काँग्रेस 
258. माण (Man) : राष्ट्रवादी काँग्रेस 
259. कराड उत्तर (Karad North) : राष्ट्रवादी काँग्रेस 
260. कराड दक्षिण (Karad South) : भाजप
261. पाटण (Patan) : राष्ट्रवादी काँग्रेस
262. सातारा (Satara) : भाजप (बलाढ्य उमेदवार) 

सोलापूर (Solapur)- भाजप : 5, शिवसेना (उद्धव ठाकरे) : 1, राष्ट्रवादी काँग्रेस : 3, काँग्रेस  : 1, इतर  : 1

244. करमाळा Karmala : राष्ट्रवादी काँग्रेस
245. माढा (Madha) : राष्ट्रवादी काँग्रेस 
246. बार्शी (Barshi) : शिवसेना (उद्धव ठाकरे)
247. मोहोळ (Mohol-SC) : राष्ट्रवादी काँग्रेस 
248. सोलापूर शहर उत्तर (Solapur City North) : भाजप 
249. सोलापूर शहर दक्षिण (Solapur City  South) : काँग्रेस 
250. अक्कलकोट (Akkalkot) : भाजप
251. सोलापूर दक्षिण (Solapur South) : भाजप 
252. पंढरपूर (Pandharpur) : भाजप 
253. सांगोला (Sangola) : शेकाप (PWPI)
254. माळशिरस (Malshiras-SC) : भाजप  

पुणे (Pune) – भाजप : 9, काँग्रेस : 4, राष्ट्रवादी काँग्रेस : 8

195. जुन्नर (Junnar) : राष्ट्रवादी काँग्रेस 
196. आंबेगाव (Ambegaon) : राष्ट्रवादी काँग्रेस 
197. खेड (Khed Alandi) : राष्ट्रवादी काँग्रेस 
198. शिरुर (Shirur) : राष्ट्रवादी काँग्रेस 
199. दौंड (Daund) : भाजप 
200. इंदापूर (Indapur) : भाजप 
201. बारामती (Baramati) : राष्ट्रवादी काँग्रेस 
202. पुरंदर (Purandar) : काँग्रेस 
203. भोर (Bhor) : काँग्रेस 
204. मावळ (Maval) : राष्ट्रवादी काँग्रेस 
205. चिंचवड (Chinchwad) : भाजप 
206. पिंपरी (Pimpri-SC) : राष्ट्रवादी 
207. भोसरी (Bhosari) : भाजप 
208. वडगाव शेरी (Vadgaon Sheri) : भाजप 
209. शिवाजीनगर (Shivajinagar) : काँग्रेस 
210. कोथरुड (Kothrud) : भाजप 
211. खडकवासला (Khadakwasla) : भाजप 
212. पर्वती (Parvati) : भाजप 
213. हडपसर (Hadapsar) : राष्ट्रवादी काँग्रेस 
214. पुणे छावणी (Pune Cantonment-SC) : काँग्रेस 
215. कसबा पेठ (Kasba Peth) : भाजप  

(पुण्यात भाजपचा मनसेसोबत असलेला समझोता भाजपला फायदेशीर ठरू शकतो). 

या बातम्या वाचा: 



[ad_2]

Related posts