[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Maharashtra News: शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे (Shiv Sena : Uddhav Balasaheb Thackeray) आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांना पंचतारांकित हॉटेलसाठी दिलेली परवानगी पालिकेनं रद्द केल्याच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हन देण्यात आलं आहे. जोगेश्वरी (Jogeshwari) येथील आरक्षित जमिनीवर पंचतारांकित हॉटेल उभारण्यासाठी दिलेली परवानगी रद्द करण्यात आली आहे. आपल्याला कोणतीही कारणे दाखवा नोटीस न बजावता, तसेच कोणतीही बाजू न ऐकता परवानगी रद्द केल्याचा दावा करणारी रीट याचिका रवींद्र वायकर (Ravindra Waikar News) आणि त्यांची पत्नी मनीषा वायकर, व्यावसायिक भागीदार आसू निहलानी, अमरदीपसिंग बिंद्रा आणि राज लालचंदानी यांनी हायकोर्टात दाखल केली आहे. मंगळवारी न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सादर झाली. या याचिकेची दखल घेत हायकोर्टानं सुनावणी बुधवारी तातडीनं सुनावणी निश्चित केली आहे. आज या याचिकेवर तातडीची सुनावणी पार पडणार आहे.
प्रकरण नेमकं काय?
जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर) येथील आरक्षित भूखंडावर हॉटेलसाठी दिलेली परवानगी जानेवारी 2021 मध्ये पालिकेनं रद्द केली होती. ती रद्द करण्याचा पालिकेचा निर्णय नैसर्गिक न्याय तत्त्वाच्या विरूद्ध असल्यानं तो रद्द करण्याची मागणी या याचिकेतून करण्याच आली आहे. तसेच ही याचिका प्रलंबित असेपर्यंत पालिकेच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्याची मागणीही वायकरांनी याचिकेतून केली आहे.
हॉटेलसाठी आधी दिलेल्या परवानग्यांची माहिती उघड न करता बांधकाम करण्यासाठी दिलेल्या प्रमाणपत्राची मुदतही संपत आल्याचं सांगून पालिकेनं 15 जून रोजी वायकरांना दिलेली परवानगी रद्द केली आहे. 18 जून 2005 रोजी त्यांनी ही जमीन खरेदी केली होती. नवीन विकास नियंत्रण प्रोत्साहन नियमावलीनुसार, (डीसीपीआर) आपण 70 टक्के जमीन महापालिकेला देऊन चईट क्षेत्रफळ निर्देशांक वापरण्यास पात्र असल्याचा दावा वायकर यांनी केला आहे.
12 ऑक्टोबर 2020 रोजी पालिकेला देण्याची 70 टक्के जागा वगळून उर्वरित जागेवर पंचतारांकित हॉटेलच्या बांधकामासाठी महापालिकेकडे नव्यानं अर्ज सादर केला गेला. 5 डिसेंबर 2020 रोजी याचिकाकर्त्यांच्या प्रस्तावाला तत्कालीन मुख्य अभियंत्यांनी त्याला मान्यता दिली. हस्तांतरित जागेचा संदर्भ दिल्यानंतर 20 जानेवारी 2021 रोजी पालिकेनं वायकरांना हॉटेलसाठी ना हरकत प्रमाणपत्रासह बांधकामासंदर्भातील प्रमाणपत्रही जारी केलम. मात्र, गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात महापालिकेच्या अधिकाऱ्यानं वायकरांना पडताळणीसाठी संबंधित कागदपत्रं पुन्हा एकदा सादर करण्यास सांगितलं. यावर वायकरांच्या वास्तुविशारदांनी उत्तर दिल्यानंतरही कोणत्याही कारणांविना या हॉटेलसाठी दिलेली परवानगी पालिकेनं रद्द केल्याचा आरोप वायकरांनी केला आहे.
[ad_2]