Church From 16th Century Emerged In Mexico Lake Due To Drought Watch Photos; अचानक १६ व्या शतकातील वास्तू दिसली, पाहून लोकांना धक्का, नेमकं प्रकरण काय?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मेक्सिको: जिथे कालपर्यंत फक्त पाणी होते. तिथे आज अचानक चर्च दिसू लागल्याने साऱ्यांनाच धक्का बसला. हे पाहून लोकांना खूप आश्चर्य वाटले. या घटनेमागचे कारण आता समोर आले. हे प्रकरण मेक्सिकोचे असल्याची माहिती आहे. गेल्या अनेक दशकांपासून ही जागा पाण्याने पूर्णपणे वेढलेली होती. तेव्हा इथे एकही इमारत किंवा रचना दिसत नव्हती. आता येथे एक मोठा चर्च दिसून आला आहे.त्यामागील कारण म्हणजे जेव्हा पाणी सुकल्याने हा चर्चा समोर आल्याचं सांगितले जात आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, येथील लोकांचे म्हणणे आहे की, हे सर्व पाच महिन्यांपूर्वी सुरू झाले होते. पाच महिन्यांपासून धरणातील पाण्याची पातळी कमी होत गेली. ती सतत कमी होत गेली आणि आता या धरणात फारच कमी पाणी शिल्लक आहे. त्यामुळे या धरणाच्या तळाशी असलेलं हे चर्च दिसून आलं.

Church

हा चर्च १९६० मध्ये बुडाला होता

या ठिकाणचे चर्च १९६० च्या दशकात धरणाच्या पाण्यात बुडाले होते. कधी-कधी काळात जेव्हा जेव्हा पाण्याची पातळी खाली जायची तेव्हा हा चर्च दिसायचा. पण, आता तो पूर्णपणे बाहेर आला आहे. हे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र, यामुळे मच्छीमारांच्या उत्पन्नावर मोठं संकट निर्माण झाले आहे. तापमान खूप जास्त असून त्यामुळे पाण्याचं तापमान मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्यामुळे मासे मरत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

साडेआठ कोटींची चोरी करुन देवदर्शनाला निघाली, पण १० रुपयांच्या फ्रूटीचं आमिष अन् खेळ खल्लास
हा चर्च १६ व्या शतकातील

रिपोर्ट्समध्ये हा चर्च १६व्या शतकातील असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटो शेअर करताना एका यूजरने लिहिले की, ‘जवळपास ६० वर्षांत पहिल्यांदाच, मेक्सिकोमधील १६व्या शतकातील एक आश्चर्यकारक चर्च जलाशयातून बाहेर आले आहे. एक प्राचीन कॅथोलिक चर्च दुष्काळग्रस्त मेक्सिकोच्या जलाशयातून बाहेर आलं आहे.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

[ad_2]

Related posts