India Given Big Shock To Pakistan And They Ran Away To ICC ; भारताने धक्का दिल्यावर पाकिस्तानची आयसीसीकडे धाव

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद आता पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. त्यामुळे भारताने धक्का दिल्यावर आता पाकिस्तानच्या संघाने थेट आयसीसीकडे धाव घेतल्याचे समोर आले आहे.भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डातील वाद थांबण्यास तयार नाही. आशिया कप स्पर्धा निश्चित झाल्यामुळे हा वाद शमला असे वाटत असतानाच वर्ल्ड कप कार्यक्रमास अंतिम स्वरूप देण्यात पाकिस्तान अडथळे आणत आहेत. त्यातच आता २०२५ मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक वन-डे क्रिकेट स्पर्धेत भारत न खेळल्यास त्यासाठी आर्थिक हमी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) द्यावी, अशी मागणी पाकिस्तान बोर्डाने केली आहे.

आशिया कप स्पर्धेसाठी पाकिस्तानात संघ पाठवण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नकार दिला. त्यामुळे आता चॅम्पियन्स स्पर्धेबाबत पाकिस्तान कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही. या स्पर्धा संयोजनाचा करार आयसीसीसह करण्यापूर्वी पाकिस्तानने कायदेशीर सल्ला घेतला आहे. त्यामुळेच यजमानपदाच्या करारावरील स्वाक्षरीपूर्वी पाकिस्तानने अटी घालण्यास सुरुवात केली आहे. आशिया कपसाठी ‘हायब्रिड मॉडेल’ स्वीकारण्यास बीसीसीआयने पाकिस्तानला भाग पाडले. आता चॅम्पियन्स स्पर्धेच्या वेळीही हेच घडू शकेल, अशी धास्ती पाकिस्तानला वाटत आहे. चॅम्पियन्स स्पर्धेबाबत बीसीसीआय आक्रमक झाल्यास आयसीसीची भूमिका काय असेल, अशी थेट विचारणा पाकने केली आहे. भारताने स्पर्धेवर बहिष्कार टाकल्यास त्याचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक परिणाम होतील. या परिस्थितीत आयसीसीने हमी रक्कम द्यावी अशी मागणीही पाकिस्तानने केली आहे. पाकिस्तानातील आशिया कप ‘हायब्रीड’ पद्धतीने होत असल्यामुळे आशिया क्रिकेट परिषदेकडून पाकिस्तानला आर्थिक भरपाई देण्यात येणार आहे. आता हेच पाकिस्तानला चॅम्पियन्स कपबाबत हवे आहे.

माझा नंबर बऱ्याच जणांकडे, पण कर्णधारपद सोडल्यानंतर फक्त धोनीचा मेसेज आला | विराट कोहली

कारण भारत पाकिस्तानमध्ये खेळण्यास तयार नाही. हे भारताने आशिया चषकावेळी दाखवून दिले आहे. त्यामुळे आता जर पुढच्या वर्षीच्या स्पर्धेतही भारत सहभागी झाला नाही तर पाकिस्तानला कोट्यावधींचा फटका बसू शकतो. त्यामुळे आता पाकिस्तानने भारताच्या वादानंतर थेट आयसीसीकडे धाव घेतल्याचे समोर आले आहे.

[ad_2]

Related posts