Wireless Charging Process How Your Phone Get Charge Without Charger Know In Detail News Marathi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Wireless Charging Process : आजच्या काळात तंत्रज्ञानात बरेच बदल होत आहेत. नवनवीन टेक्नाॅलाॅजी (Technology) अस्तित्वात येत आहेत. सध्या वायरलेस चार्जरचा ट्रेंड वाढत आहे हे तुम्ही पाहिलेच असेल. फोन चार्ज करण्याकरीता वायरलेस चार्जिंगचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत.या चार्जरने फोन चार्ज करण्यासाठी वायरचा वापर केला जात नाही. यामध्ये एक खास प्लेट आहे, ज्यावर फोन ठेवताच फोन स्वतः चार्ज होऊ लागतो. यासाठी फोनला कोणत्याही प्रकारे कनेक्ट करण्याची गरज नाही आणि या प्लेटवर फोन ठेवताच चार्जिंग सुरू होते. तुम्ही कधी विचार केला आहे का की ही प्लेट कशी काम करते आणि ही कोणती सिस्टीम आहे, ज्यामुळे फोन ठेवताच चार्जिंग सुरू होते घेऊया जाणून.

वायरलेस चार्जर कसा वापरला जातो (How To Use Wireless Charger)

फोनच्या ए टाइप, बी टाइप किंवा सी टाइप चार्जरमध्ये चारमधून वीज आत पाठवली जाते, परंतु वायरलेस चार्जरची स्थिती वेगळी आहे. यासाठी एक विशेष उपकरण वापरले जाते, या उपकरणाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन (Elecromagnetic Induction) म्हणतात. हे उपकरण हवेत विद्युत ऊर्जा सोडते आणि त्यामुळे सर्वत्र चुंबकीय क्षेत्र तयार होते. यामुळे फोनमधील कॉपर कॉइल येथून ऊर्जा घेते आणि बॅटरीला पाठवते. यामुळे फोनची बॅटरी चार्ज होऊ लागते.  फोन चार्ज करण्यासाठी स्वतंत्र वायर किंवा कोणत्याही पिनची आवश्यकता नाही. फोनचा कोणताही प्लग न वापरता तुम्ही फोन चार्ज करू शकता.हे उपकरण सामान्य चार्जरप्रमाणेच इलेक्ट्रिसिटीला जोडले जाते.

एक्सपर्टनुसार,  ही फोन चार्ज करण्याची योग्य पद्धत नाही? (According To The Expert , This Is Not The Right Way To Charge A Phone)

मात्र एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार हा मार्ग अतिशय घातक ठरू शकतो. यामुळे चार्जिंग करताना फोन प्रमाणापेक्षा जास्त गरम होऊन तुमचा फोन लवकर खराब होऊ शकतो. तसेच काही वेळेस फोनचा स्फोट होण्याचीही शक्यता असते. याशिवाय जे फोन फार हायटेक नसतात त्यात हा चार्जर फारसा यशस्वी मानला जात नाही. तसेच, जेव्हा वायरलेस चार्जिंग केले जाते, तेव्हा फोन पुन्हा पुन्हा चार्ज करताना वारंवार डिस्कनेक्ट होतो, जे फोनसाठी चांगले नाही.

 

इतर महत्वाच्या बातम्या

WhatsApp New Feature: आता व्हॉट्सअॅपवर नाही होणार अनोळखी कॉल्सचा त्रास, लाँच केले नवे फिचर

[ad_2]

Related posts