Titanic tourist submarine Oceangate Titan submersible debris found pilot crew believed to be dead; टायटन पाणबुडीचे अवशेष आढळले, पाचही पर्यटकांचा मृत्यू

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

वॉशिंग्टन: तब्बल १११ वर्षांपूर्वी अटलांटिक महासागरात बुडालेल्या टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या पाणबुडीतील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे मानले जात आहे. बेपत्ता असलेल्या पाचही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती टायटन सबमर्सिबल ट्रीपचे नेतृत्व करणार्‍या कंपनीने व्यक्त केली आहे. पाणबुडीच्या बाह्य आवरणासह तिचे काही अवशेष सापडल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ओशनगेट एक्सपीडिशन्सने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी आपला पायलट आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) स्टॉकटन रश, प्रवासी शहजादा दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद, हमिश हार्डिंग आणि पॉल हेन्री नार्गोलेट यांना गमावले आहे.

रविवारी पाणबुडी बेपत्ता झाली होती. या पाणबुडीमध्ये ९६ तास म्हणजेच चार दिवस पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा शिल्लक होता.

शोधकार्य सुरु असलेल्या भागात डेब्रीज सापडल्याचे यूएस कोस्ट गार्डने आधीच स्पष्ट केले आहे. टायटॅनिकच्या ढिगाऱ्याजवळ रिमोट-नियंत्रित अंडरवॉटर सर्च वेहिकलने या डेब्रीज शोधल्या होत्या.

काय आहे मोहीम?

पर्यटकांना टायटॅनिक बोटीचे अवशेष दाखवणारी पाणबुडी ओशनगेट एक्सपीडिशन्सकडून चालवली जाते. खोल समुद्रात मोहिमा राबवण्याचं काम कंपनीकडून केलं जातं.

बुडालेल्या टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. कॅनडाच्या न्यूफाऊंडलँडमध्ये उत्तर अटलांटिकच्या तळाशी असलेले जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. टायटॅनिकचे अवशेष ३८०० मीटर खोलवर आहेत. यासाठी एका पर्यटकाला २ कोटी रुपये मोजावे लागतात.

टायटॅनिक जहाज १५ एप्रिल १९१२ रोजी समुद्रात बुडालं. या दुर्घटनेत १५०० जणांचा मृत्यू झाला. हिमनगाला आदळल्यानंतर जहाजाचे दोन तुकडे झाले.

[ad_2]

Related posts