Virendra Sehwag Can Be Team India Chief Selector; वीरेंद्र सेहवाग होऊ शकतो चीफ सिलेक्टर? BCCI च्या अटींमध्ये एकदम फिट; पण…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. सेहवागला मुख्य निवडकर्ता पदाची ऑफर देण्यात अली होती या संबंधित सर्व बातम्या त्याने फेटाळून लावल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या प्रश्नांना उत्तर देताना वीरूने सांगितले की, या संदर्भात बीसीसीआयने कधीही संपर्क केला नाही. स्टिंग ऑपरेशनच्या घटनेनंतर भारतीय क्रिकेटच्या मुख्य निवडकर्त्याचे पद रिक्त आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये चेतन शर्माला भारतीय खेळाडू आणि संघ निवडीशी संबंधित अनेक गुपिते उघड करणाऱ्या स्टिंग ऑपरेशनमध्ये सापडल्याने त्याला आपले पद गमवावे लागले होते. तेव्हापासून, माजी भारतीय सलामीवीर शिव सुंदर दास अंतरिम मुख्य निवडकर्ता म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. निवडकर्त्यांच्या पॅनेलमध्ये एस शरथ (दक्षिण), सुब्रतो बॅनर्जी (मध्य), सलील अंकोला (पश्चिम) या सदस्यांचा समावेश आहे.सेहवाग होणार मुख्य निवडकर्ता

बीसीसीआयला आशिया चषक आणि विश्वचषकापूर्वी आपला मुख्य निवडकर्ता निवडायचा आहे, ज्यासाठी भरती प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. निवड समितीचा अध्यक्ष उत्तर विभागातून येणार असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे. युवराज सिंग, गौतम गंभीर आणि हरभजन सिंग यांसारखी मोठी नावे ज्यांनी नुकतीच निवृत्ती घेतली आहे, परंतु अटींनुसार तिघेही पाच वर्षांच्या निवृत्ती कालावधीचे निकष पूर्ण करू शकलेले नाहीत. अशा स्थितीत वीरेंद्र सेहवागही पाच वर्षांच्या निवृत्तीच्या ब्रॅकेटमध्ये बसतो, पण एवढ्या कमी पगारावर तो ही जबाबदारी घ्यायला तयार नाही.

निवड समितीने डावललं, पृथ्वीने जे केलं त्याने आता दिग्गज चक्रावले

मोठ्या खेळाडूंना मुख्य निवडकर्ता व्हायचे नाही?

निवड समितीच्या अध्यक्षांचे वार्षिक वेतन एक कोटी रुपये आहे, तर इतर चार सदस्यांचे वेतन ९० लाख रुपये आहे. २००६ च्या काळात माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर (२००६-२००८) अध्यक्ष असताना निवड समितीचे प्रमुख माजी खेळाडू शेवटच्या वेळी होते. त्यानंतर कृष्णमाचारी श्रीकांत (२००८-२०१२) अव्वल स्थानावर होते. समालोचन आणि समर्थनांसह माजी क्रिकेटपटूंची कमाई मुख्य निवडकर्त्याच्या पगारापेक्षा खूप जास्त आहे, त्यामुळे मोठी नावे या पदापासून दूर जातात.

[ad_2]

Related posts