Rajesh Deshmukh Pune Fake Account In The Name Of Rajesh Deshmukh Five Times In Two Months

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rajesh Deshmukh Pune :   पुण्यात सायबर क्राईमच्या घटना  (Fake Facebook Account) सातत्याने वाढत आहेत. त्यात आता सामान्य नागरिकांनंतर अधिकाऱ्यांवरही या सायबर चोरांची नजर आहे. मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या नावे फेसबुक किंवा अन्य सोशल मीडिया (Rajesh Deshmukh Pune )अकाउंटवर अधिकाऱ्यांच्या नावे फेक अकाउंट उघडले जात आहे. सायबर चोरट्यांच्या रडारवर पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख आहेत. त्यांच्या नावाने फेक अकाउंट तयार करत नागरिकांची फसवणूक करण्याचा सायबर चोरांचा विचार आहे. 

पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या नावाने सलग दोन महिन्यात पाचव्यांदा फेक फेसबुक अकाउंट सुरु करण्यात आले आहे. त्या अकाउंटला राजेश देशमुख यांचा फोटोदेखील प्रोफाईल म्हणून लावण्यात आला आहे. सायबर चोर याच अकाउंटवरुन अनेक नागरिकांना रिक्वेस्ट पाठवत आहे. पोलिसात तक्रार करून सुद्धा जिल्हाधिकारी देशमुख यांचे फेक अकाउंट बनवले जात आहे.  त्यामुळे कुठल्याही बनावट अकाउंटला बळी पडू नका, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्याचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांचंदेखील बनावट फेसबूक अकाऊंट तयार करण्यात आलं होतं. त्यांचं बनावट फेसबुक अकाऊंटवरुन मेसेज करुन फर्निचर विकण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक करण्याच्या प्रयत्नात असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. ‘कोणीतरी माझे फेक फेसबुक अकाऊंट उघडून माझ्या लिस्टमधील अनेकांना रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याशी मेसेंजरवर संवाद साधत आहे. फर्निचर विकण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक करण्याच्या प्रयत्नात आहे. “माझे अन्य कोणतेही फेसबुक खाते नाही. कोणीही संतोषकुमार नावाचा CRPF मधील अधिकारी माझ्या परिचयाचा देखील नाही. या फेक अकाऊंटबाबत मी फेसबुकवर रिपोर्ट केला आहे. तसेच सायबर क्राईमच्या वेबसाईटवर ऑनलाईन तक्रार नोंदवली आहे. माझ्या मित्रांना विनंती आहे की त्यांनी या प्रकाराला फसू नये आणि कोणताही आर्थिक व्यवहार करु नये,” असं आवाहन त्यांनी केलं होतं.

Rajesh Deshmukh Pune :  खबरदारी घेण्याचंं पुणेकरांना आवाहन…

सध्या पुण्यात सायबर चोरांनी धुमाकूळ घातला आहे. रोज अनेक सामान्य नागरिकांची फसवणूक केली जाते अनेकांना फेक माहिती देत गंडा घातला. त्यामुळे आता प्रत्येकाला खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. अनेक नागरिकांना मोबाईलमधील अनेक गोष्टी कळत नाही त्यामुळे सहज म्हणून आलेल्या लिंकवर क्लिक करतात. त्यातून त्यांचा डेटा चोरी जाण्याची शक्यता असते किंवा अशा फेक अकाउंटवरदेखील अनेक  लोकांना विश्वास बसतो आणि सायबर चोरांच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे कोणतीही कृती करताना काळजी घेण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. 

 

 

[ad_2]

Related posts