कोकण हार्टेड गर्ल सोबत KEM हॉस्पिटलमध्ये घडला धक्कादायक प्रकार, मनसे आली मदतीला

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असणारी मराठमोळी खासकरून मालवणी युट्यूबर अंकिता प्रभू वालावलकर पुन्हा एकदा चर्चेत आहे. तिचा नवा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

मुंबईतील केइएम रुग्णालयातील खरी परिस्थिती सगळ्यांसमोर आणली आहे. रुग्णांना रुग्णालयात मिळणाऱ्या उपचारांवर तिने व्हिडिओतून प्रश्न उपस्थित केले आहेत. 

अंकिताचा मित्र असलेला किरण चव्हाण याच्या मेंदूला दुखापत झाल्याने त्याला सिंधुदुर्ग येथून थेट केइएम रुग्णालयात आणण्यात आलं होतं. त्याला १४ जून रोजी इस्पितळात दाखल करण्यात आलं.

अंकिता, जी मूळची सिंधुदुर्ग इथली रहिवासी आहे. किल्ला सुरुवातीला सिंधुदुर्ग इथल्या रुग्णालयात दाखल केले होते. पुढे चांगले उपचार व्हावेत म्हणून त्याला केईएम मध्ये दाखल करण्यासाठी किरणच्या बाबांनी अंक्ताकडे मदत मागितली.

अंकिताने के ई एम सी संपर्क साधून किरणला 14 जूनला रुग्णालयात दाखल करून घेतले. 

तसेच किरणच्या उपचारासाठी तिने 4.71 लाखांचा निधी देखील गोळा केला होता.

“त्याला केईएम रुग्णालयात आणण्यासाठी कुटुंबाने 40,000 रुपये खर्च केले. त्याला १४ जून रोजी दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन काम करत नसल्याचे सांगत रुग्णालयाने नातेवाईकाला सीटी स्कॅनसाठी बाहेर नेण्यास सांगितले,” ती म्हणाली.

चव्हाण यांचे काका सत्यवान रावूल म्हणाले की,  किरणला सीटी स्कॅनसाठी जवळच्या पॅथॉलॉजी मध्ये नेले. पण सिटी स्कॅन करता नाही आला. 

“तो अर्धकोमात होता आणि हालचाल करत होता. ते म्हणाले की सीटी स्कॅन केवळ भूल देऊन केले जाऊ शकते आणि आम्हाला परत पाठवण्यात आले,” रावूल म्हणाले.

चव्हाण यांचे कुटुंब केईएम रुग्णालयात २४ तास लढत होते. संपूर्ण दिवसभर त्याच्याकडे कोणताही डॉक्टर फिरकला नाही. त्याच्यावर कोणतेही उपचार झाले नाहीत. ही गोष्ट समजताच अंकिताही इस्पितळात पोहोचली आणि तिने याबद्दल विचारपूस केली.

शेवटी तिने मदत मिळवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चित्रपट प्रमुख अमेय खोपकर यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर सूत्र हलली आणि किरणवर उपचार सुरू झाले. अमेय खोपकर स्वत: तिकडे उपस्थित होते. 

किरणला चव्हाण यांना अत्यावश्यक वैद्यकीय मदत मिळाली, त्यावंतर अंकिताने केईएम रुग्णालयाचा व्हिडिओ आणि तिच्या अनुभवाचा व्हिडिओ पोस्ट केला.

ती म्हणाली की, हे केवळ एका रुग्णाबद्दल नाही तर संपूर्ण आरोग्य व्यवस्थेबद्दल आहे. एका व्यक्तीचे असे हाल होतात. मग इतर रुग्णांचे काय होत असेल. 

तिच्या पोस्टमध्ये तिने म्हटले आहे की डॉक्टरांना दोष देता येणार नाही कारण ते आधीच दबावाखाली आहेत. अशा घटना टाळण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. 

रेडिओलॉजी विभागातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉस्पिटलमध्ये दोन सीटी स्कॅन मशीन असून त्यापैकी एक गेल्या वर्षभरापासून बंद आहे.

“फंक्शनल सीटी स्कॅन मशीन २४ तास कार्यरत असते ज्यामुळे आम्हाला तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागतो. सीटी स्कॅनमध्ये पुन्हा तांत्रिक बिघाड झाला आणि गेल्या तीन ते चार दिवसांपासून ते कार्यान्वित नाही,” डॉक्टर म्हणाले.


[ad_2]

Related posts