Gold Rate Today In Nashik Price Of Gold Dropped By Rs 3,000 And In Pune By Rs 4,000 Maharashtra

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nashik-Pune Gold Rate : नाशिकसह (Nashik) पुण्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी असून सोने खरेदी करत असाल तर चांगली संधी चालून आली आहे. नाशिकमध्ये सोन्याच्या दरात तीन रुपयांची घसरण झाली असून पुणे शहरात तब्बल चार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोने खरेदीला चांगला मुहूर्त असून लग्नसराईच्या हंगामात ग्राहकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. 

लग्नसराई सुरू असतांनाच सोनं चांदीच्या भावात (Gold Rate Today) चांगलीच घसरण झाली असून सर्व सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऐन सणासुदीच्या काळात सोन्याचे दर तब्बल 64 हजार रुपये प्रतितोळा इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचल्याने सर्व सामान्य ग्राहकांच्या अवाक्याबाहेर ते गेले होते. मात्र जागतिक पातळीवर बँकांचे व्याजदर वाढल्याने अनेक गुंतवणूकदार हे बँकामध्ये गुंतवणूक करण्यासाठी वळल्याने सोन्याची मागणी कमी होऊन त्याचा परिणाम म्हणजे सोन्याचे दर कमी झाले आहेत. तर चांदीमध्ये आठवडाभरात तीन हजार रुपयांची घसरण होऊन 72 हजार वरून 69 हजार रुपयांवर आली आहे. दर कमी होताच खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठेत गर्दी वाढल्याचं दिसून येत आहे. 

तर पुणे शहरातही (Pune Gold rate) सध्या चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. आज चांदीचे दर 70 हजार 500 वर आहेत. तर आठवड्याच्या सुरुवातीला चांदीचे दर 74 हजार 400 वर होते. एकूण 4000 ची घसरण झाली आहे. वर्षाच्या सुरुवातीला सोन्याच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली होती. त्यामुळे नागरिक देखील त्रस्त झाले होते. लग्नसराई आणि इतर काही कारणांमुळे सोने चांदी खरेदी करताना लोकांना घाम फुटत होता. तर मे महिन्याच्या सुरुवातीला चांदीचे दर 70 हजारच्या वर होते. मात्र गेल्या दीड महिन्यात चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण झाल्याचं बघायला मिळते आहे. 

पुण्यातील मागील काही महिन्यांचे दर 

गेल्या अनेक दिवसांपासून सोने चांदीच्या जागतिक बाजारात चढ उतार असल्याने भारतीय बाजारात देखील चढता उतरता आलेख आहे. अशातच आज सोने चांदीच्या भावात चांगलीच घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असून ऐन लग्नसराईत सोने खरेदीची चांगली संधी मिळाली आहे. पुण्यातील मागील काही महिन्यांचे दर पाहिले असता, मे महिन्याच्या सुरुवातीला 1 मे रोजी सोन्याचा भाव 76 हजार 500 रुपये होता. 15 मे रोजी 74 हजार 100,  31 मे रोजी 72 हजार 500 रुपये तर जून महिन्यात 1 जून रोजी 73 हजार 200 रुपये, 15 जून रोजी 72 हजार 900 तर 24 जून रोजी 70 हजार 500 रुपये अशी एकूण 06 हजार रुपयांची घसरण झाली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत चांदीच्या दरांमध्ये आपल्याला 6000 ची घसरण झाल्याचं समजते आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची घसरण होत असून त्याचा परिणाम देशांतर्गत सराफा बाजारात होत आहे. यामुळे ग्राहकांना मात्र दिलासा मिळाला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

[ad_2]

Related posts