India Squad For WI Tests Sunil Gavaskar Had A Strong Reaction On Cheteshwar Pujara ; संघ निवडीवरून सुनील गावसकर संतापले; संपूर्ण टीमच्या अपयशासाठी एकाला बळीचा बकरा केले

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: जुलै महिन्यात भारताचा संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जात आहे. या दौऱ्याची सुरुवात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेने होणार आहे. त्यानंतर या दौऱ्यात ३ सामन्यांची वनडे तर ५ सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. बीसीसीआयने कसोटी आणि वनडे मालिकेसाठी घोषणा केली आहे. संघ घोषणेनंतर सर्वाधिक चर्चा आहे ती अनुभवी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजार याला संघातून वगळण्यात आल्याची होय.

पुजाराच्या जागी यशस्वी जयसवाल याला संघात स्थान देण्यात आले असून तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची शक्यता आहे. गेल्या दशकापासून पुजारा कसोटी संघात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत होता. भारतीय संघातील पुजारा वगळता अन्य कोणताही मोठा बदल दिसला नाही.

Ajinkya Rahane: कमबॅक कसे करावे हे अजिंक्य रहाणेकडून शिका; काढून घेतलेले पद मानाने परत मिळवले
भारतीय संघाची निवड आणि पुजाराला वगळण्यात आल्यानंतर माजी कर्णधार व दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी जोरदार टीका केली आहे. निवड समितीसमोर अनेक मोठ्या स्टार खेळाडूंना विश्रांती देऊन युवा खेळाडूंना संघात स्थान देण्याची संधी होती. पण तसे केले नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील फलंदाजीच्या खराब कामगिरीसाठी बळीचा बकरा पुजाराला करण्यात आल्याचे गावसकर म्हणाले.

आमची (भारताची) फलंदाजी खराब झाली त्यासाठी बळीचा बकरा का केला गेला. तो भारतीय क्रिकेटचा एक प्रामाणिक खेळाडू आहे. शांत आणि संयमी आहे. त्याचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स नाहीत जो आवज उठवतील. म्हणून तुम्ही त्याला संघाबाहेर कराल का? हे समजण्यापलीकडे आहे.

Team India New Captain: रोहित शर्माचा उत्तराधिकारी ठरला; BCCI लवकरच स्टार खेळाडूकडे देणार जबाबदारी
गावसकरांनी यावर देखील नाराजी व्यक्त केली की, निवड समितीला प्रश्न विचारता येत नाही. आजकल निवड समिती पत्रकार परिषद घेऊन संघाची घोषणा करत नाहीत. निवड समितीला संघाचा पराभव अथवा खेळाडूंचा अपयशाबद्दल प्रश्न विचारले जात नाहीत. मला वाटत नाही की आजकल निवड समितीच्या अध्यक्षांनी कोणा माध्यम प्रतिनिधींशी चर्चा केली असेल.

पुजारा भारतासाठी फक्त कसोटी खेळतो. गेल्या वर्षाच्या सुरुवातीला त्याला संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर काउंटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्याने पुन्हा संघात स्थान मिळाले. WTC फायनलमध्ये मात्र त्याला १४ आणि २७ धावा करता आल्या. फायनलमध्ये रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली यांना देखील धावा करता आल्या नाहीत. तरी ते संघात आहेत.

आयपीएल ट्रॉफी घेऊन तिरुपतीच्या दर्शनाला, सीएसकेकडून खास पूजा

[ad_2]

Related posts