Launching Dates Of Samsung Galaxy Z Flip 5 In July And Now Check Price Specifications Tech News Marathi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Samsung Galaxy Z Flip 5: अॅण्ड्रॉईड स्मार्टफोन निर्मितीच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून सॅमसंगची ओळख आहे. कंपनी दरवर्षी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन स्मार्टफोनची सिरीज घेऊन येत असते. यावेळीही आता सॅमसंग नवीन फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे.  कंपनी पुढील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक समारंभ आयोजित करणार आहे. या समारंभात Samsung Galaxy Z Flip 5 या नवीन सिरीजचा स्मार्टफोन लाँच करू शकते. हा फोन प्रीमियम कॅटेगिरीतील आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर Revegnus ने सांगितल्यानुसार, कंपनी Samsung Galaxy Z Flip 5 या नवीन स्मार्टफोनची किमत Galaxy Z Flip 4 च्या जवळपास असू शकतो. या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर Revegnus नुसार, हा नवीन स्मार्टफोन 81 हजार 960 रूपये इतक्या किमतीसोबत लाँच केला जाऊ शकतो. गेल्यावर्षी सॅमसंगने भारतात Galaxy Z Flip 4  हा स्मार्टफोन लाँच केला होता. त्यावेळी कंपनीने या फोनला 89 हजार 999 रूपये इतक्या किमतीत लाँच केला होता. 

सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर Revegnus ने माहिती शेअर केल्यानुसार, कंपनी  Galaxy Z Fold 5 स्मार्टफोनला Galaxy Z Fold 4  च्या तुलनेत कमी किमतीत लाँच करू शकते. ही लीक करण्यात आलेली माहिती खरी ठरली, तर फोल्डेबल स्मार्टफोनची आवड असणाऱ्या युजर्ससाठी ही आनंदादायी बातमी आहे. कंपनीने Galaxy Z Fold 5 या स्मार्टफोनची किमत 1 लाख 54 हजार 999 इतक्या किमतीत विक्रीसाठी उपलब्ध केला होता. या फोनची किमत  Galaxy Z Fold 5  च्या जवळपास असण्याची शक्यता आहे. मात्र, सर्व युजर्सनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, या स्मार्टफोनबाबत नेमकी माहिती फोन लाँच केल्यानंतर समोर येईल. हा फोल्डेबल स्मार्टफोन प्रीमियम सिरीजच्या कॅटेगिरीतील आहे.

Samsung Galaxy Z Flip 5 चे स्पेसिफिकेशन 

सॅमसंग जो नवीन स्मार्टफोन आहे  त्याच्या अनेक भन्नाट फिचरसह उपलब्ध होणार आहे. या फोनमध्ये 3700mAh इतक्या क्षमतेची बॅटरी असणार आहे आणि  25 वॅटचा फास्ट चार्चिंग सपोर्ट मिळणार आहे. या फोन स्नॅपड्रॅगन  8 जनरेशन 2 SoC आणि  IP58 रेटींगसह उपलब्ध होऊ शकतो.  या नवीन  स्मार्टफोनमध्ये कंपनी अनेक सुधारणा करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच इतका एफएचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. जो 120hz इतक्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो. या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन डिटेल्सबद्दल फोन लाँच करण्यात आल्यानंतर अधिक माहिती मिळू शकते. सद्यस्थितीत मिळालेली माहिती ही अधिकृत नसून लीक करण्यात आलेली  माहिती आहे. यामुळे अधिकृत माहितीसाठी सॅमसंग काय सांगतेय, यासाठी युजर्सला वाट पाहावी लागणार आहे.

पुढील महिन्यात लाँच होतील जबरदस्त स्मार्टफोन

पुढील महिन्यात काही स्मार्टफोन निर्मिता कंपन्या भन्नाट स्मार्टफोन लाँच करणार आहेत. यामध्ये बजेट फ्रेंडली फोनपासून ते सर्वोत्कृष्ट ब्रँडच्या कॅटेगिरीतील फोन लाँच होऊ शकतात. काही कंपन्यांकडून आपल्या लेटेस्ट फोनची लाँचिंगची तारीख जाहीर केल्याचं समोर येतंय.

काही स्मार्टफोन निर्माता कंपन्या आणि त्यांचा स्मार्टफोन व लाँचिंग तारीख  

1. मोटोरोला Razr 40 सिरीज – 03 जुलै 2023 

2. IQOO नियो 7 प्रो- 4 जुलै 2023 

3. नथिंग फोन 2 – 11 जुलै 2023 

4. रियल मी नारजो 60  सिरीज- जुलै महिन्या लाँच होऊ शकतो. 

इतर महत्त्वाच्या  बातम्या वाचा :

सॅमसंगचा Galaxy Z Flip 4 आणि Fold 4 बाजारात, जाणून घ्या किंमत अन् फिचर

[ad_2]

Related posts