Buldhana News Asaduddin Owaisi Buldhana Rally Aurangzeb Controversy Maharashtra Poltics Latest News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Asaduddin Owaisi : एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी हे शनिवारी बुलढाण्यातील मलकापूर येथे आले होते. मलकापूर येथे कार्यकर्त्यांना भेटल्यानंतर त्यांनी मलकापूर येथे ईदगाह मैदानावर एक सभाही घेतली. या सभेत ओवैसी यांच्या भाषणादरम्यान औरंगजेबाच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्यामुळे ही सभा आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 

असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेत हजारो कार्यकर्ते जमल्याने सगळीकडे गोंधळ निर्माण झाला. कार्यकर्ते ओवैसी यांना पाहण्यासाठी उत्सुक होते पोलिसांचाही मोठा तगडा बंदोबस्त सभेच्या ठिकाणी होता. ओवैसी आले, त्यांनी भाषणाला सुरुवात करताच पोलिसांनी सुरक्षेसाठी तयार केलेल्या डी मध्ये कार्यकर्त्यांना येण्यास मज्जाव केला. मात्र त्यावेळी स्वतः भाषणात ओवैसींनी  कार्यकर्त्यांना डी मध्ये बसण्याच्या सूचना केल्या आणि पोलिसांनी मोठ्या मेहनतीने तयार केलेल्या डी ला तोडून कार्यकर्ती आत घुसले यावेळी एकच गोंधळ झाला आणि सभास्थळी पोलिसांची दाणादाण उडाली. शेकडो कार्यकर्ते हे ओवैसीनच्या अगदी स्टेटजवळ पोहोचले आणि घोषणाबाजी सुरू झाली.

ओवैसी यांचे भाषण सुरू झालं आणि त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना डी च्या आत मध्ये येऊन बसण्याची सूचना केली, त्यानंतर झालेल्या गोंधळात पोलीस मात्र बाजूला हटले. ओवैसींनी  भाषण सुरू करताच मधून मधून कार्यकर्ते गोंधळ करतच होते व घोषणाबाजी करत होते. यावेळी थोडी चेंगराचेंगरी सुद्धा झाली. कार्यकर्ते भाषण ऐकून उत्तेजित होत होते आणि घोषणाबाजी करत होते. त्याचवेळी स्टेजच्या अगदी जवळ एका तरुणांच्या समूहाने ‘जब तक चांद सुरज रहेगा…. औरंगजेब तेरा नाम रहेगा’ अशा प्रकारच्या घोषणा दिल्याचा आरोप काही हिंदुत्ववादी संघटनांनी केला. सभा झाल्यानंतर हा व्हिडिओ माध्यमांच्या हाती आला. यावेळी मात्र सभेतून परत जाताना कार्यकर्त्यांनी पारपेट भागात काही अल्लाहू अकबर चे नारे लावले आणि यामुळे मात्र या परिसरात तणाव झाला. आणि सर्व माध्यमे त्या दिशेने धावत सुटली पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केला आणि परिस्थिती नियंत्रणात आली व पुढील अनर्थ टळला.

पार पेठ भागातील घोषणाबाजीचा व्हिडिओ

ओवैसींच्या भाषणादरम्यान सभेतील कार्यकर्त्यांनी वस्तीच्या अगदी जवळ असलेल्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणा लावल्याचा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटच्या माध्यमातून लावला. विदर्भाचे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे प्रांत अध्यक्ष अमोल अंधारे यांनी सुद्धा अशा प्रकारच्या घोषणा लावल्याचा आरोप केला आणि त्यानंतर मग राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरू झाल्या यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , किरीट सोमय्या यांनी ही या घडलेल्या प्रकारावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर एम आय एम चे अध्यक्ष ओवैसी यांनी मात्र या प्रकार घडला नसल्याचे सांगितले आहे व अशी कुठलीही घोषणाबाजी झाली नसल्याचं सांगत याचं खापर माध्यमांच्या माथ्यावर फोडले.

[ad_2]

Related posts