कृषी उत्पन्न बाजार समितीतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार? शासनस्तरावर हालचालींना वेग

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: कृषी उत्पन्न बाजार समितीतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन देण्याबाबत शासनस्तरावर हालचालींना वेग आला आहे. 25 मे 1967 आणि त्यानंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याविषयीचा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने अभ्यास समिती नियुक्त केली आहे. राज्याच्या पणन विभागाच्या सहसचिवांच्या ध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली आहे. 

राज्य सरकारच्या या समितीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या प्रतिनिधींचा सहभाग असेल. या समितीला तीन महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्य़ात आले आहेत. 

[ad_2]

Related posts