Buldhana News Minor Girl Was Raped And Then Strangled To Death By The Seller Of Worship Items In Front Of Goddess Temple

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Buldhana: रोहडा येथील तपोवन देवी मंदिर परिसरात पूजेचे साहित्य विकणाऱ्या सदानंद भगवान रोडगे (26, रा. रोहडा, ता. चिखली) या नराधमाने 6 वर्षीय चिमुकलीचा बळी घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले. कोणतेही पुरावे मारेकऱ्याने मागे सोडले नव्हते. मात्र गुन्हेगार कितीही अट्टल असला तरी ‘कानुन के हात लंबे होते हैं!’ हे पोलिसांनी दाखवून दिले.

संशयित म्हणून पोलिसांनी आधीच सदानंद रोडगे याला ताब्यात घेतले होते, आधी “मी तो नव्हेच” अशी भूमिका घेणाऱ्या सदानंदला पोलिसांनी खाक्या दाखवला अन् त्यानंतर मात्र तो पोपटासारखा बोलू लागला. उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार या प्रकरणाच्या तपासासाठी अंढेरा पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते. अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश हिवरकर या अधिकाऱ्यांनी तपासकार्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

नेमकी काय आहे घटना?

अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील एक चिमुकली 12 मे रोजी आई वडिलांसोबत चिखली तालुक्यातील रोहडा येथील तपोवन देवी संस्थान येथे लग्नासाठी आली होती. त्याच दिवशी सकाळी सव्वा अकरा वाजेपासून ती बेपत्ता झाली होती. घटनेची माहिती पसरताच संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहीम सुरू केली, मात्र ती सापडली नाही. 12 मे च्या संध्याकाळी अंढेरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी म्हणजेच 13 मे च्या दुपारी तपोवन देवी मंदिराच्या पाठीमागील डोंगराळ भागात चिमुकलीचा मृतदेह सापडला. मृतदेहावर दगडाची पाळ रचलेली होती, रुमालाने गळा आवळून तिचा खून झाल्याचे समोर आले. त्यानंतर जिल्हाभरात एकच खळबळ उडाली. तपासाचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले. स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने तपासावर लक्ष ठेवून होते. उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा आणि अंढेरा पोलिसांचे पथक वेगवेगळ्या बाजूंचा विचार करून तपासात व्यस्त होते. दुसरीकडे जनसामान्यांचा प्रक्षोभ होता, एक दिवस चिखली शहरात बंद पुकारण्यात आला होता. आरोपींना लवकरात लवकर पकडण्याचा दबाव पोलिसांवर वाढत होता.

news reels reels

पोलिसांनी असा केला तपास

तपासादरम्यान पोलिसांसमोर वेगवेगळे प्रश्न उभे राहिले होते. मंदिर परिसरातील सीसीटिव्ही बंद असल्याने पोलिसांसमोर आरोपी शोधून काढण्यासाठी मोठे आव्हान होते. हे कृत्य ओळखीतल्या व्यक्तीने केले की अनोळखीने? यात कुटुंबातल्या व्यक्तीचा सहभाग तर नाही ना? कारण पीडित चिमुकलीची आई पतीपासून विभक्त राहत होती, त्यामुळे हे कृत्य तिच्या वडिलांनी तर केले नसावे ना? असाही संशय पोलिसांना होता. त्यादृष्टीने देखील पोलिसांची तपासचक्रे फिरत होती.

दरम्यान, शवविच्छेदन करताना तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आल्याने पोलिसांच्या तपासाची दिशा बदलली. पोलिसांनी त्यादृष्टीने अनेक जणांची चौकशी केली. परिसरातील अट्टल गुन्हेगारांना देखील पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले, मात्र त्यातून काही निष्पन्न झाले नाही. मंदिर परिसरात नारळ आणि पूजेच्या साहित्याची विक्री करणाऱ्या लोकांची देखील पोलिसांनी चौकशी केली, त्यावेळी पूजेच्या साहित्याचे दुकान असलेल्या सदानंद भगवान रोडगे या तरुणावर पोलिसांचा संशय बळावला.

…म्हणून बळावला संशय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदानंदच्या चेहऱ्यावर नखांचे व्रण पोलिसांना दिसले. त्याला त्याबद्दल विचारणा केली असता दाढीचे ब्लेड लागल्याचे तो सांगत होता. मात्र, दाढी करून देणाऱ्याने ते निशाण ब्लेडचे नसल्याचे सांगितले. सदानंदच्या बोलण्यात वेळोवेळी भिन्नता आढळत होती. त्यामुळे पोलिसांनी डॉक्टरकडून सदानंदची तपासणी केली असता त्याच्या चेहऱ्यावरील व्रण नखांचे असल्याचे समोर आले आणि पोलिसांचा संशय 100 टक्के बळावला. त्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली, आधी नाही नाही म्हणणाऱ्या सदानंदने नंतर मात्र खुनाची कबुली दिली. आधी सदानंदने तिच्यावर अत्याचार केला, नंतर बोंब होऊ नये म्हणून त्याने गळा आवळून तिचा खून केल्याचे समोर आले.

आरोपीला पॉर्न व्हिडीओ बघायची सवय

सदानंदला पॉर्न व्हिडिओ पाहण्याचे व्यसन होते. त्याच्या मोबाईलच्या सर्च हिस्ट्रीमध्ये अधिक वेळ पॉर्न व्हिडीओ सर्च करण्यात आल्याचे दिसत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या अधिकाऱ्यांनी लावली आपली पोलिसी कसब पणाला

जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश हिवरकर यांच्यासह पोलीस पथकाने हा तपास केला.

हेही वाचा:

शारीरिक भूक भागवण्यासाठी आले वेश्या वस्तीत, सापळा रचून चार अट्टल गुन्हेगारांवर पोलिसांची झडप, पिस्तुलसह कार जप्त

[ad_2]

Related posts