Laxmi Vishnu Shubh Yog : 25 जुलैला बुध गोचरमुळे विष्णु लक्ष्मी शुभ संयोग! ‘या’ राशींना लागणार लॉटरी

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Laxmi Vishnu Shubh Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार एका ठराविक वेळेनंतर ग्रह आपली स्थिती बदलतात. त्यामुळे काही शुभ तर काही अशुभ योग तयार होतात. अधिक मासातील बुध गोचर (Budh Gochar 2023) लक्ष्मी विष्णु शुभ योग (Laxmi Vishnu Shubh Yog) किंवा लक्ष्मी नारायण योग (Lakshmi Narayan Yoga) तयार होतो आहे. 

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह 25 जुलैला सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सिंह राशीत शुक्र ग्रह आधीच विराजमान आहे. त्यामुळे अधिक मासात शुक्र बुध युती (Shukra Budh Yuti) होणार आहे. यातून तयार होणाऱ्या शुभ योगामुळे 6 राशींच्या आयुष्यात लॉटरी लागणार आहे. ही युती  7 ऑगस्टपर्यंत सिंह राशीत लक्ष्मी नारायण योग राहील. त्यामुळे बुध गोचरमुळे या 6 राशीच्या लोकांची 69 दिवस मजा असणार आहे. (Budh Gochar 2023 Shukra Budh Yuti making Lakshmi Narayan Yoga or Laxmi Vishnu Shubh Yog mercury transit in leo zodiac signs will get money)

मेष (Aries)

बुध गोचर आणि त्यामुळे तयार झालेला लक्ष्मी नारायण योगामुळे मेष राशीच्या लोकांना धनलाभाचे योग जुळून आले आहेत. हा विद्यार्थ्यांना हा काळ अधिक फलदायी ठरणार आहे. प्रत्येकात कामात तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. 

मिथुन (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा राजयोग वरदान ठरणार आहे. मिथुन राशीच्या स्वामी बुध असल्याने यांना सर्वाधिक लाभ होणार आहे. लांब प्रवास घडणार आहे. लेखक, साहित्यिक आणि संपादकांसाठी हा सुवर्ण काळ ठरणार आहे. 

सिंह (Leo)

सिंह राशीमध्येच लक्ष्मी नारायण योग तयार होत असल्याने या लोकांची लॉटरी लागणार आहे.  त्यामुळे तुमचं बँक बॅलेन्स मजबूत होणार आहे. घरात आनंदी वातावरण असणार आहे. 

तूळ (Libra)

या राशीच्या लोकांना बुध गोचरमुळे नशिबाची पूर्णपणे साथ मिळणार आहे. करिअर आणि व्यवसायात मोठा धनलाभाचे योग आहेत. कला-सांस्कृतिक क्षेत्राशी लोकांसाठी हे दिवस अतिशय सुखदायी असणार आहे. 

कुंभ (Aquarius)

कुंभ राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योग वरदान आणि भाग्यशाली ठरणार आहे. या काळात तुमचे प्रेम संबंध मजबूत होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम असेल. वैवाहिक जीवनात आनंद असेल. आर्थिक स्थिती सुधारणार आहेत. 

वृश्चिक (Scorpio)

वृश्चिक राशीचे लोकांसाठी हा राजयोग यश घेऊन आला आहे. प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. करिअरमध्ये यशाचे नवीन मार्ग सापडणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्याना नोकरीची उत्तम संधी मिळणार आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ उत्तम असेल. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts