[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पुणे : दर्शना पवार हत्याकांडात (Darshana Pawar Murder Case) थरकाप उडवणारी बाब समोर आली आहे. आरोपी राहुल हंडोरेनं दर्शनाच्या गळ्यावर आधी कंपासमधीस कटरनं वार केले आणि नंतर तिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली, अशी धक्कादायक माहिती राहुलनं त्याच्या कबुलीजबाबात दिल्याची माहिती समोर आली आहे.
रागाच्या भरात माझ्या हातून गुन्हा घडला
विवाहास नकार दिल्यानं राजगडावर जाताना त्यांच्यात वादावादी झाली, राग अनावर झाल्यानं राहुलनं आधी तिच्या गळ्यावर कंपासमधील कटरनं तीन ते चार वार केले, त्यानंतर तिच्या गळ्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. नंतर त्यानं बाजूचा दगड उचलून तिच्या डोक्यावर जीवघेणा वार केला. दर्शनाची हत्या करण्याचा माझा हेतू नव्हता, रागाच्या भरात माझ्या हातून हा गुन्हा घडला, असा दावा राहुलनं केला आहे.
दर्शनाचं लग्न ठरलेलं कळताच राहुल हंडोरे अस्वस्थ झाला त्याने दर्शनाच्या घरच्यांना सांगितलं की, थोडी वाट पहा मी देखील परीक्षेत यशस्वी होईल आणि मग मी दर्शनाशी लग्न करेल. पण घरच्यांनी राहुलला दाद दिली नाही. सत्कारासाठी दर्शना पुण्यात आली तेव्हा राहुल तिला ट्रेकिंगच्या बहाण्याने राजगडावर घेऊन गेला
आणि तिथेच तिची हत्या केली.
वेगवेगळ्या राज्यात फिरत होता राहुल
राहुलचा तपास करण्यासाठी पोलिसांनी पाच पथकं नेमली होती. ही सगळी पथकं मुंबई, सिन्नर, लोणावळा, नाशिक आणि पुण्यात तपास करत होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी राहुलचे आणि दर्शनाचे फोन रेकॉर्ड काढले होते. त्यात दर्शना आणि राहुल नेमकं कोणाकोणाच्या संपर्कात होते याचा शोध पोलीस या रेकॉर्डच्या माध्यमातून घेत होते. राहुलचं लोकेशन चेक करण्याचा प्रयत्न करत होते. त्याचं पहिलं लोकेशन बंगळूरू, कोलकाता आणि त्याचं शेवटचं लोकेशन चंदीगडला दिसत होतं. तो ट्रेनने प्रवास करत असल्याचा अंदाज पोलिसांना होता
ग्रामीण भागातील मुलं – मुली एम पी एस सी उत्तीर्ण होण्याच्या स्वप्नाचा पाठलाग करत पुण्यात पोहचतात . मात्र थोड्याच कालावधीत वाढणाऱ्या वयाबरोबर स्वप्नाळूपणा मागे पडून वास्तवाचे चटके सुरु होतात . अशात जर यातील कोणी प्रेमात पडलं तर वगेळीच गुंतागुंत सुरु होते . दोघांपैकी एकजण परीक्षा उत्तीर्ण झाला तर ही गुंतागुंत आणखीनच वाढते . अनेकदा ही नाती अधुरी एक कहाणी ठरतात . दर्शना आणि राहुलच्या प्रकरणातून या एम पी एस सी करणाऱ्या मुला – मुलींनी हाच धडा घ्यायचाय
[ad_2]