Robber Stop Woman Robbed Her And The Asked For Facebook Friend Request On Gun Point; घरासमोरच गाठलं, बंदूक दाखवली अन् म्हणाला – मला फेसबुकवर रिक्वेस्ट पाठव, अन् मग

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

वॉशिंग्टन: अनोळखी व्यक्तीला जाणून घेण्यात आणि मैत्री करण्यासाठी फेसबुकने मोठी भूमिका बजावली आहे. फेसबुवर फक्त आपल्यापासून लांब असेलेले मित्र किंवा नातेवाईकच भेटत नाहीत तर अनेक अनोळखीही आपले मित्र होतात. एकमेकांशी मैत्री करण्यसाठी लोक फेसबुकवर एकमेकांना फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवतात. पण, एखाद्याकडून फ्रेण्ड रिक्वेस्ट मिळवण्यासाठी एखाद्या काय करु शकतो याची आपण कल्पनाही करु शकत नाही.एका व्यक्तीने आधी महिलेला लुटलं मग तिच्या डोक्यावर बंदूक ठेवली आणि तिच्याकडून स्वत:ला फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवून घेतली. ही धक्कादायक घटना अमेरिकेतील इंडियाना येथे घडली आहे. न्यूयॉर्क पोस्टने आपल्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, ही घटना अंबर बेरून नावाच्या महिलेसोबत घडली आहे. कार्यालयातून आल्यानंतर महिला घराच्या आत जात होती. तेवढ्यात तिच्यासोबत हा सर्व प्रकार घडला. दरम्यान, त्या दरोडेखोराने महिलेला बंदुकीचा धाक दाखवला. यानंतर चोरट्याने महिलेची पर्स हिसकावून घेतली. मग, बंदूक तिच्या डोक्यावर धरली.

सहा महिन्यांपासून पत्नी बोलेना, म्हणून तो सासरी गेला; जे झालं ते ऐकून पायाखालची जमीनच सरकली
डोक्यावर बंदूक ठेवताच त्याने महिलेला विचारले, तुला बॉयफ्रेण्ड आहे का? नसेल तर मला Facebook वर रिक्वेस्ट पाठव आणि मला फ्रेण्ड बनव. हे ऐकून महिला जरा दचकली, त्यानंतर तिला जबरदस्तीने त्याला फेसबुकवर अॅड करावे. त्यानंतर तो दरोडे तिथून निघून गेला. तो तेथून जाताच घाबरलेली महिला धावत आपल्या घरात शिरली आणि घरातील सर्वांना घडलेली घटना सांगितले.

Pune Murder: दर्शनाची हत्या केल्यानंतर लपण्यासाठी काय-काय केलं, राहुलचा प्लान ऐकून पोलिसही चक्रावले
काही वेळातच तिला फेसबुकवरच त्या दरोडेखोराचामेसेज आला. त्याचा मेसेज पाहिल्यानंतर ती आणखी घाबरली. त्याने लिहिलं होतं की, शांत राहा, मी तुमचे पैसे लवकरच परत करेन. तू खूप सुंदर आहेस. यानंतर महिला अधिकच घाबरली आणि तिने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून या घटनेची तक्रार दिली.

प्रेमात अडथळा, आईसोबत सतत भांडण; मुलीनं आई अन् प्रियकराच्या मदतीने वडिलांचा काटा काढला

फेसबुकच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये त्याची ओळख डॅमियन बॉयस अशी झाली असून त्याने आपली चूक मान्य केली आहे. पोलिस या प्रकरणाचा संपूर्ण तपास करत आहेत.

[ad_2]

Related posts