Youth Attacks Young Woman With Chopper In Sadashiv Peth Cctv Footage Found

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Crime news : सदाशिव पेठेत तरुणीवर मित्रानेच (Pune Crime news )  हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. पेरुगेट पोलीस चौकीजवळ सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ही मुलगी दुचाकीवरून जात असताना हॉटेल नागपूरजवळ हल्लेखोराने तिला अडवून हा प्रकार केल्याचं या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. 

सदाशिव पेठेत तरुणीवर मित्रानेच हल्ला केला. त्यानंतर तेथील एका तरुणाने आणि बाकी नागरिकांनी तिचा जीव वाचवला. हल्लेखोराला पोलिसांच्या ताब्यात दिले. या हल्ल्यामागे एकतर्फी प्रेम असल्याचं सांगितलं जात आहे. शंतनू लक्ष्मण जाधव (22 ) असे हल्लेखोराचे नाव आहे. तो पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवासी आहे आणि हल्ला झालेली तरुणी ही कोथरुड परिसरात राहते. हे दोघेही पुण्यातील महाविद्यालयात एकत्र शिक्षण घेत होते. दोघांचंही बी. कॉमचं शिक्षण घेतलं आहे. तरुणी सध्या आर्किटेक्चरचं शिक्षण घेत आहे. मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये वादावादी सुरु होती. दोन ते तीन महिने दोघांचा एकमेकांशी अबोला होता. तरुणी या तरुणाला सारखं टाळत होती. तरुणाचं एकतर्फी प्रेम असल्याने त्याने अनेक दिवस तिचा पाठलाग केला. याच सगळ्या दरम्यान राग अनावर झाला आणि त्याने आज हल्ला केला.

Pune Crime news : कुटुंबीयांना दिली होती माहिती…

हा मुलगा त्रास देत आहे आणि पाठलाग करत आहे. शिवाय अनेकदा बघत असतो, असं या तरुणीने तिच्या आईला आणि कुटुंबातील बाकी सदस्यांना माहिती दिली होती. त्यानंतर तरुणीच्या कुटुंबीयांनी तरुणाच्या पालकांना यासंदर्भात माहिती दिली होती. त्यांनी मुलाला समजावून सांगण्यासाठी विनंती केली होती. त्यानंतर तरुणाच्या कुटुंबीयांनी तरुणाला समजावलं होतं. तरुणीला त्रास देऊ नको, असं सांगितलं होतं. त्यानंतर या तरुणाने कुटुंबियांपर्यंत माहिती गेल्याचा राग धरुन ठेवला आणि थेट तिच्यावर हल्ला केला. 

Pune Crime news : आज तो नसता तर मुलीचा जीव गेला असता; तरुणीची आई

हा तरुण मागील अनेक दिवसांपासून माझ्या मुलीला त्रास देत आहे. त्यामुळे मी तिच्या घरचांकडे जाऊन त्यांना तरुणाला समजावण्यासाठी सांगितलं. माझ्या मुलीला तुमच्या मुलाशी मैत्री नाही ठेवायची असं सांगितलं. त्यानंतर त्याच्या वडिलांनी समजावतो म्हणून सांगितलं होतं. त्यानंतर त्याने पाठलाग करणं सोडलं नाही. आजही त्याने माझ्या मुलीचा पाठलाग केला. तिच्यासोबत तिचा एक मित्रदेखील होता. त्याच्यावरदेखील त्याने वार केले. आज तो नसता तर मुलीचा जीव गेला असता. त्यामुळे अशाच घटना समोर येत असेल तर मुलींच्या सुरक्षितेबाबत अनेक प्रश्न उपलब्ध होत असल्याचं तरुणीच्या आईने सांगितलं.



[ad_2]

Related posts