[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
School Teacher In Election Duty: शासकीय शाळेतील शिक्षकांना देण्यात येणाऱ्या शिक्षणबाह्य कामांची अनेकदा मोठी चर्चा झडत असते. आता निवडणूक कामाच्या सक्तीवरुन शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. शिक्षकांच्या बीएलओ (Booth Level Officer) ड्युटी रद्द करा, अन्यथा मुलांना जिल्हाधिकारी कार्यालय आणि शिक्षण विभागात शिकवायला पाठवू असा शिक्षक संघटनांनी इशारा दिला आहे. शिक्षकांना तातडीने बीएलओ कामासाठी न पाठविल्यास संबंधितांवर कारवाई करणार असल्याचा मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवले आहे. त्यावरून आता शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत.
मुंबईतील शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बीएलओच्या नियुक्त्या दिल्याने विद्यार्थ्यांना शिकवायचं कोणी ? असा प्रश्न शाळाचालकांना पडला आहे. त्यामुळे बीएलओच्या नियुक्त्या रद्द न झाल्यास विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी आणि शिक्षण निरीक्षक कार्यालयात शिकविण्यासाठी पाठविले जाईल असा इशारा शिक्षक संघटनांकडून देण्यात आल्या आहेत. शाळांमधील सर्वच शिक्षकांना मुंबईतील मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून मतदार केंद्रास्तरीय अधिकारी (बीएलओ) च्या नियुक्या स्वीकारण्याबाबत मुख्याध्यापकांवर दबाव टाकण्यात येत असल्याचा शिक्षकांचा दावा आहे. त्यामुळे शाळेतल्या सर्वच शिक्षकांना कार्यमुक्त केल्यास शाळा कशी भरवावी ? विद्यार्थ्यांना कोणी शिकवावे ?असा प्रश्न शाळा चालकांना पडला आहे.
मुंबई जिल्ह्यातील जवळपास सर्व शाळांतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून काम दिले जात आहे. 15 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांना शिकविणे हे शिक्षकांचे प्राथमिक कर्तव्य असेही अनेक शिक्षकांनी म्हटले आहे. मुंबईतील अनेक शिक्षक रोज शाळेत येण्यासाठी आणि जाण्यासाठी म्हणून चार तासाचा प्रवास करतात. दिवसाचे 10 ते 11 तास घराबाहेर राहणाऱ्या शिक्षकांना अंशतः किंवा पूर्णवेळ बीएलओ ड्युटी देणे हे अन्यायकारक ठरेल, त्यामुळे या डीएलओ ड्युटी करून कार्यमुक्त करण्यासंदर्भात सर्व शिक्षक संघटना आक्रमक झाले असून त्या संदर्भात प्रशासनाकडे मागणी केली आहे.
मात्र, दुसरीकडे मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून संबंधित शाळांना या संदर्भात पत्र पाठवून तातडीने शिक्षकांनी ज्या कामासाठी तयार राहावे असे सांगण्यात येत आहे. अधिकाऱ्याचे काम हे पूर्णवेळ करणे अपेक्षित नसून शाळेतील शिक्षणाचे काम करून उर्वरित वेळात हे काम करावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय, नियुक्त केलेल्या शिक्षकांनी हे काम न केल्यास किंवा कामावरून झाल्यास संबंधित शिक्षकांवर कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा पत्रातून मुख्याध्यापकांना देण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासन कोणता निर्णय घेणार याकडे शिक्षण वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
[ad_2]