[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Chhatrapati Sambhaji Nagar News : धडाकेबाज IAS अधिकारी म्हणून राज्यात ओळखल्या जाणाऱ्या सुनील केंद्रेकरांनी (Sunil Kendrekar) मोठा निर्णय घेतला असून, केंद्रेकरांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. सध्या छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत असलेले सुनील केंद्रेकर यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दाखल केला होता, ज्याला शासनाने मंजुरी दिली आहे. तर त्यांनी हा निर्णय का घेतला? याबाबत अनेक चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान त्यांच्या या निर्णयानंतर एक सुजान नागरीक म्हणून त्यांनी छत्रपती संभाजीनगर पाणी पुरवठा योजनेत सहकार्य करण्याची विनंती करता येईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शासनाकडे गेल्या महिन्यात व्हीआरएससाठी अर्ज केला होता. आएएस अधिकारी तथा छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांनी स्वेच्छानिवृत्तीचा मोठा निर्णय घेतल्याने अनेकांना धक्का बसला आहे. त्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी महिन्याभरापूर्वी केलेल्या अर्जाला अप्पर मुख्य सचिवांनी मंगळवारी मान्यता दिल्याचे पत्र काढले आहे. दरम्यान याबाबतची माहिती शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाला दिली. त्यावर न्यायालयाने म्हटले आहे की, केंद्रेकरांच्या स्वेच्छानिवृत्तीवर आमचा कोणताही आक्षेप नाही. मात्र त्यांना एक सुजान नागरीक म्हणून पाणी पुरवठा योजनेत सहकार्य करण्याची विनंती करता येईल.
केंद्रेकरांनी असा निर्णय का घेतला?
राज्यातील काही मोजक्या धडाकेबाज आयएएस अधिकाऱ्यांच्या यादीत केंद्रेकरांच्या नावाची नेहमी चर्चा असते. विक्रीकर सहआयुक्त, प्रभारी जिल्हाधिकारी, बीडचे जिल्हाधिकारी, सिडकोचे मुख्य प्रशासक, प्रभारी मनपा आयुक्त आणि आता विभागीय आयुक्त पदावर त्यांनी काम केले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी कठोर भूमिका घेण्यात केंद्रेकर नेहमी चर्चेत राहिले आहेत. बीडचे जिल्हाधिकारी असताना त्यांची बदली झाली आणि अख्खा बीड त्यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला होता. शेतकरी कुटुंबातून आलेल्या केंद्रेकरांनी नेहमीच शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या उपयोजना राबवण्याचा प्रयत्न केला. मात्र अशा धडाकेबाज आयएएस अधिकाऱ्याने अचानक व्हीआरएस घेतल्याने त्यांनी हा निर्णय का घेतला असावा याचे उत्तर मात्र अजूनही मिळाले नाही.
‘त्या’ निर्णयाचा त्रास?
मराठवाड्यात वाढत असलेल्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी केंद्रेकरांनी काही दिवसांपूर्वी एक सर्व्हे सुरु केला होता. या सर्व्हेनंतर त्यांनी खरीप आणि रब्बी दोन हंगामाच्या सुरवातील पेरणीसाठी शेतकरी कुटुंबाला प्रत्येकी दहा हजार एकरी मदत करण्याचा निकष काढला होता. तसा रिपोर्ट सरकारकडे पाठवला होता. मात्र त्यांच्या या भूमिकेमुळे सरकार आणि सनदी अधिकाऱ्यांच्या लॉबीचा त्यांना त्रास झाल्याची चर्चा आहे. त्यामुळेच दोन ते अडीच वर्ष सेवेचे बाकी असताना त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
पेरणीसाठी शेतकऱ्यांना प्रती एकर 10 हजार रुपये द्या, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांची सरकारकडे शिफारस
[ad_2]