[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Pune News : राज्यात 29 जूनला बकरी ईद साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्यातदेखील या बकरी ईदची तयारी पूर्ण झाली आहे. या बकरी ईदनिमित्त मुस्लीम बांधव एकत्र येऊन अनेक परिसरात मशिद आणि ईदगाह मैदानावर किंवा सार्वजनिक ठिकाणी सामूहिक नमाज पठण करुन ईद साजरी करतात. पुण्यातील गोळीबार मैदानातही ईद मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. या परिसरात मुस्लीम बांधवांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे या परिसरात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. काही रस्ते बंद करुन त्यासाठी पर्यायी रस्ते सुचवण्यात आले आहेत.
कोणते रस्ते सुरु, कोणते रस्ते बंद?
बंद मार्ग : गोळीबार चौकातून स्वारगेटकडे जाणारा मार्ग हा नमाज पठणाच्या वेळी बंद करण्यात येईल.
पर्यायी मार्ग : गोळीबार चौकातून डाव्या बाजूस वळून सीडीओ चौक पुढे उजवीकडे वळून गिरीधर भवन चौक पुढे उजवीकडे वळून सेव्हन लव्हज चौकातून इच्छित स्थळी जातील.
बंद मार्ग : सीडीओ चौक ते गोळीबार चौकाकडे येणारी वाहतूक नमाज पठण काळात सकाळी 6 वाजेपासून ते 11 वाजेपर्यंत पूर्णत: बंद करण्यात येईल.
पर्यायी मार्ग : लुल्लानगरकडून येवून खाण्या मारुती चौकाकडे जाणारी वाहतूक खटाव बंगला चौक-नेपीयर रोड-मम्मादेवी चौक बिशप स्कूल मार्गे किंवा वानवडी बाजार चौक – भैरोबानाला येथून किंवा गिरीधर भवन चौकातून इच्छित स्थळी जातील.
बंद मार्ग : सेव्हन लव्हज चौकाकडून गोळीबार मैदानकडे येणारी वाहतूक बंद करण्यात येईल.
पर्यायी मार्ग : सॅल्सबरी पार्क सीडीओ चौक-भैरोबानाला येथून इच्छित स्थळी जातील.
बंद मार्ग : सोलापूर रोडने मम्मादेवी चौकातून गोळीबार चौकाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात येईल.
पर्यायी मार्ग : मम्मादेवी चौक बिशप स्कूल मार्गे किंवा जुने कमांड हॉस्पिटल मार्गे इच्छितस्थळी जातील.
बंद मार्ग : भैरोबानाला ते गोळीबारकडे जाणारी वाहतुक भैरोबानाला येथे बंद करुन एम्प्रेस गार्डन व लुल्लानगरकडे वळविण्यात येईल.
पर्यायी मार्ग : प्रिन्स ऑफ वेल रोडने (एम्प्रेस गार्डन रोड) किंवा भैरोबानाला- वानवडी बाजार – लुल्लानगर येथून इच्छित स्थळी जातील.
बंद मार्ग : कोंढवा परिसरातून गोळीबारकडे येणाऱ्या सर्व जड माल वाहतूक वाहने, प्रवासी वाहतूक करणारी जड वाहने, एसटी बसेस, पीएमपीएमएल बसेस यांना मनाई करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग : सदर वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करुन लुल्लानगर चौकातून भैरोबानाला चौकामार्गे किंवा गंगाधाम चौकातून इच्छित स्थळी जातील.
हेही वाचा-
Pune Crime News : विवाहित तरुणीने दिली बॉयफ्रेंडच्या अपहरणासाठी सुपारी; थेट घेऊन गेली गुजरातला, सगळा प्रकार पाहून पोलीसही चक्रावले!
[ad_2]