Pune Police A Man Attacking A Woman In Pune Police Take Big Decision Damini Pathak

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Police : पुण्यातील सदाशिव पेठेत मित्राने मैत्रिणीवर कोयत्याने हल्ला केला. या  हल्ल्यात तरुणी थोडक्यात बचावली. याच घटनेने अख्खा महाराष्ट्र हादरला. ही घटना ज्यावेळी घडली त्यावेळी हल्लेखोर तरुणाला नागरिकांनी चोप दिला. त्यानंतर नागरिकांनी हल्लेखोराला पोलीस ठाण्यात घेऊन गेले, त्यावेळी ठाण्यात पोलीसच नव्हते. या सगळ्यानंतर आता पुणे पोलिसांनी सुरक्षिततेबाबत मोठे निर्णय घेतले आहेत.  त्यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी आता पुणे पोलिसांनी कंबर कसल्याचं दिसत आहे. 

Pune Police : कोणते आहेत नवे निर्णय?

पुणे महिला पोलिसांची 25 दामिनी पथके नव्याने निर्माण होणार. 
– आतापर्यंत 15 दामिनी पथके होती.  ती वाढून 40 होणार. 
– पेट्रोलिंगसाठी आणखीन 100 बीट मार्शल नियुक्त करण्यात येणार.  
– आतापर्यंत पेट्रोलिंग साठी 100 बीट मार्शल होते ते वाढून 200 होणार. 
– पुणे पोलीस शहरातील महाविद्यालयांमधे समुपदेशन कार्यक्रम राबवणार. 
– पुण्यातील प्रत्येक पोलीस चौकी 24 तास सुरु राहणार.

Pune Police महिला सुरक्षेसाठी नव्या उपाययोजना

महिलांच्या सुरक्षिततेसाठी काही नव्या उपाययोजनदेखील पोलिसांकडून आखण्यात आल्या आहेत. या मोहिमेत गुन्हे शाखा, वाहतूक शाखा आणि स्थानिक पोलिसांचा सहभाग असेल. आयुक्तांनी गुन्हे शाखा आणि वाहतूक पोलिसांसह सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Pune Police : मोहिमेत खालील उपाययोजनांचा समावेश असेल-

शहरभर पोलीस दलाने रात्रीची गस्त वाढवली.
– आयटी कंपन्यांमध्ये सुरक्षा जागरुकता उपक्रम आयोजित करणे.
– रिक्षाचालकांचे परवाने तपासणे, तसेच उबेर आणि ओला सारख्या प्लॅटफॉर्मवरुन खाजगी वाहने आणि चालकांची छाननी करणे.
– गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे.
– शहराबाहेरुन येणाऱ्या प्रवाशांना टार्गेट करुन लुटमारीच्या घटना रोखण्यासाठी स्वारगेट, शिवाजीनगर बसस्थानक आणि रेल्वे-स्थानकांच्या आसपास पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
– उशिरापर्यंत बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर आणि गुन्हेगारी नोंदी असलेल्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

नेमकं काय घडलं होतं?

पुण्यातील सदाशिव पेठेत दर्शना पवार हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता राहिली. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर तिच्या मित्रानं कोयत्याने हल्ला करून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. पण एमपीएससीची तयारी करणाऱ्या दोन तरुणांनी प्रसंगावधान दाखवत हल्लेखोर तरुणाला रोखलं. सदाशिव पेठेतील गर्दीच्या ठिकाणी हा प्रसंग घडल्यावर देखील बराच वेळ पोलिसांचा पत्ता नव्हता असं स्थानिकांचं म्हणणं आहे. यामुळं पुण्यातील कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुणे पोलीस नक्की करतायत काय?, असा प्रश्न पुणेकर विचारत आहे.

हेही वाचा-

[ad_2]

Related posts