[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई आणि परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे लोकल ट्रेनच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेवर सलग तिसऱ्या दिवशी लोकल विस्कळीत झाली.
रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना अंबरनाथ यार्डातून सुटणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये चढण्यापासून रोखले आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी रेल्वे पोलिस आणि प्रवाशांमध्ये बाचाबाची होऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
पावसामुळे लोकल उशिराने धावत आहेत. त्याचबरोबर यार्डातून सुटणाऱ्या लोकल गाड्यांमध्येही प्रवाशांना बसू दिले जात नाही. या संतप्त प्रवाशांनी अंबरनाथ येथे लोकल थांबवताच गोंधळ उडाला.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सकाळी ७.५१ वाजता अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळून एक जलद लोकल सुटते. लोकल स्थानकावर पोहोचण्यापूर्वी अनेक प्रवासी यार्डातून लोकलमध्ये चढतात आणि जागा अडवतात. त्यामुळे फलाटावरून लोकल पकडावी लागलेल्या प्रवाशांच्या जागा न मिळाल्याच्या तक्रारी होत्या. त्यानंतर काल रेल्वे पोलिसांनी यार्डात जाऊन प्रवाशांना लोकलमधून उतरवले. यामुळे या प्रवाशांनी 10 मिनिटे लोकल रोखून धरली.
यानंतर सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांच्या कारवाईमुळे प्रवासी आणि रेल्वे पोलिसांमध्ये पुन्हा बाचाबाचीची परिस्थिती निर्माण झाली आणि प्रवाशांनी पुन्हा एकदा रेल्वे रोखून धरली.
[ad_2]