Ahmednagar Marriage News Wedding With Chhatrapati Shivaji Maharaj Aarti Song Viral News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अहमदनगर: लग्न म्हटलं की वेगवेगळ्या धार्मिक प्रथा परंपरा आल्या. हिंदू धर्मात लग्न सोहळ्यात वेगवेगळ्या पूजाविधी, मंगलअष्टक यांना विशेष महत्व असतं. मात्र अहमदनगरमध्ये एका लग्नसोहळ्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. हे लग्न मंगलअष्टकांशिवाय पार पडलं. मंगलअष्टकाऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून आणि त्यांची स्फूर्ती गीते लावून हा लग्न सोहळा पार पडला. अहमदनगरच्या थोरात आणि धिसले परिवारातील योगिनी आणि विकास यांच्या विवाहसोहळ्यात मंगलअष्टका म्हटली गेली नाहीत. 

आपले लग्न हे आठवणीत राहावे म्हणून अनेकजण वेगवेगळ्या प्रकारे लग्न सोहळा करत असतात. कुणी हवेत लग्न करतो तर कुणी पाण्यात लग्न करतो. मात्र योगिनी आणि विकास यांनी आपला विवाह सोहळा हटक्या पद्धतीने पार पाडला. केवळ आठवणीत राहण्यासाठी नाही तर या विवाह सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचे असलेले आपल्या जीवनातील अनन्य साधारण महत्व आलेल्या वऱ्हाडी मंडळींपर्यंत पोहचावे हा त्यांचा हेतू. यासाठी त्यांनी मंगल अष्टकाऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करत लग्न सोहळा पार पाडला. विशेष म्हणजे आलेल्या पाहुण्यांचा सत्कारावर होणाऱ्या खर्चाला फाटा देत त्यांनी तो खर्च शिक्षण संस्था आणि विविध मंदिरांना दान म्हणून दिला. 

योगिनी या अहमदनगर शहरातील गोरक्षनाथ थोरात यांच्या कन्या आहेत. गोरक्षनाथ थोरात हे हे रयत बँकेमध्ये शाखाधिकारी म्हणून निवृत्त झालेले आहेत तर गृहिणी असलेली त्यांची पत्नी शैला थोरात या धार्मिक वृत्तीच्या. आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी त्यांनी मोठी मेहनत घेतली. त्यांची एक मुलगी शिक्षिका आहे तर मुलगा अभिषेक थोरात हा इंजिनियर झाल्यानंतर एका अमेरिकन कंपनीत नोकरीला लागला. ज्या मुलीचंआज लग्न झालं ती योगिनी थोरात ही एमसीएसची पदवी घेऊन पुण्यात एका कंपनीत नोकरी करते. 

करमाळा येथील नवरा मुलगा विकास किसन धिसले हा बीटेक आणि एमबीए पदवी घेऊन उच्चपदस्थ कंपनीत पुणे येथे जॉब करत आहे. दोन्ही कुटुंबं उच्चशिक्षित आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जी प्रेरणा या महाराष्ट्राला दिली त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरात कुटुंब हे निस्सीम भक्त आहेत. त्यामुळे हे लग्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने आणि स्फूर्तीने व्हावे अशी दोन्ही कुटुंबियांची इच्छा होती. त्यानुसार हा अनोखा विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. या अनोख्या विवाह सोहळ्याची शहरातच नाही तर जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

ही बातमी वाचा: 

 

[ad_2]

Related posts