[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाची वेबसाईट हॅक झाली आहे की आरोग्य विभागात पुन्हा एखादा महाघोटाळा झाला आहे? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण मंत्रालयात आपली ओळख आहे. आपण आरोग्य विभागात नोकरीला लावून देतो असे सांगत 50 हजार रुपये भरा असे परीक्षार्थींना फोन येत आहेत. नाशिकमधील एका विद्यार्थ्याला तसा फोन आला आहे. आता त्या फोन कॉलची रेकॉर्डिंग एबीपी माझा’च्या हाती लागली आहे. यामध्ये पैसे भरा असे सांगणाऱ्या व्यक्तीकडून संबंधित विद्यार्थ्याच्या वडिलांचे पूर्ण नाव, रोल आयडी, आईचे नाव, मेल आयडी तंतोतंत खरे सांगण्यात येत आहे. दरम्यान, ड संवर्गातील पदांसाठी ऑक्टोबर 2021 मध्ये झालेल्या परीक्षेच्या निकालाची सर्व विद्यार्थी वाट पाहत असताना हा व्यक्ती पुढच्या महिन्यात 7 जुलैला निकाल लागणार असल्याचंही सांगतोय. यावर विद्यार्थ्याने आता याप्रकरणी सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. </p>
[ad_2]