World Cup 2023 Qualifier Points Table Update Zimbabwe Sri Lanka West Indies Know Details Marathi Sports News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

World Cup 2023 Qualifier Points Table : भारतात होणारा विश्वचषक राऊंड रॉबिन पद्धतीने होणार आहे. दहा संघामध्ये ही स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून रंगणार आहे. 10 संघापैकी आठ संघ निश्चित झाले आहेत. दोन स्थानासाठी झिम्बाब्वेमध्ये क्वालिफायर सामने सुरु आहेत. साखळी फेरीचे सामने झाल्यानंतर आता सुपर – 6  साठी सहा संघ पात्र ठरले आहेत. प्रत्येक संघाचे तीन तीन सामने होणार आहेत. आघाडीचे दोन संघ भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी पात्र होतील. दोन वेळच्या विजेत्या वेस्ट इंडिजचं विश्वचषकातील आव्हान खडतर झालेय. क्वालिफायरच्या साखळी फेरीत वेस्ट इंडिजची सुमार कामगिरी झाली आहे. त्यामुळे स्पर्धेतून बाहेर पडण्याचे संकट त्यांच्यावर ओढावले आहे.

थेट पात्र होणारे 8 संघ कोणते ?

1. न्यूझीलंड  2. इंग्लंड 3. भारत  4. ऑस्ट्रेलिया 5. पाकिस्तान 6. दक्षिण अफ्रीका  7. बांगलादेश  8. अफगानिस्तान

क्वालिफायरल सुपर 6 मध्ये कोणते संघ पोहचले ?

1. श्रीलंका 2. वेस्ट इंडीज  3. झिम्बाब्वे 4. ओमान 5. स्कॉटलँड 6. नेदरलँड

क्वालिफायरमध्ये आव्हान संपलेले चार संघ कोणते ?

1. अमेरिका  2. आयरलँड 3. यूएई  4. नेपाळ

1. सुपर सिक्समध्ये सहा संघ कसे पोहचले ?

क्वालिफायर राउंडमध्ये दहा संघामध्ये स्पर्धा रंगली होती. या दहा संघाना अ आणि ब अशा दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले होते.  या दहा संघामध्ये 20 सामने झाले. दोन ग्रुपमधील आघाडीचे तीन तीन संघ सुपर – 6 साठी पात्र ठरले आहेत. 

सुपर -6 मध्ये पोहचलेल्या संघाची गुणतालिकेतील स्थिती










संघ सामने विजय पराभूत गुण नेट रनरेट
श्रीलंका 2 2 0 4 2.638
झिम्बाब्वे 2 2 0 4 0.982
स्कॉटलँड 2 1 1 2 -0.06
नेदरलँड 2 1 1 2 -0.739
वेस्ट इंडिज 2 0 2 0 -0.35
ओमान 2 0 2 0 -3.042

2. सुपर-6 मध्ये आघाडीवर कोणते संघ ?

सुपर-6 स्टेजमध्ये श्रीलंका आणि झिम्बाब्वे  4-4 गुणांसह टॉपवर आहेत. चांगला नेटरनरेट असल्यामुळे श्रीलंकेचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे तर झिम्बाब्वेचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. सुपर-6 मध्ये संघाच्या ग्रुप स्टेजमधील सामनेही ग्राह्य धरले जाणार आहेत. क्वालिफाय करणाऱ्या संघांनी एकमेंकासोबत खेळलेल्या सामन्यातील विजयानुसार गुण दिले जातात. 

झिम्बाब्वेने ग्रुप ए मध्ये सुपर 6 मध्ये क्वालिफाय करणाऱ्या वेस्ट इंडिज आणि नेदरलँड या संघाचा पराभव केला आहे. एका सामने दोन गुण मिळतात. त्यामुळे झिम्बाब्वेचे चार गुण आहेत.  स्कॉटलँड ग्रुप स्टेजमध्ये झिम्बाब्वेकडून पराभूत झाला होता पण वेस्ट इंडिजला त्यांनी हरवले होते. त्यामुळे स्कॉटलँडच्या नावावर दोन गुण आहेत. 

वेस्ट इंडीजने ग्रुप स्टेजमध्ये दोन सामने जिंकले, पण सुपर 6 मध्ये पोहचलेल्या स्कॉटलँड आणि झिम्बाब्वेकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या नावावर सध्या 0 गुण आहेत. अशाच पद्धतीने श्रीलंका, ओमान आणि नेदरलँड यांचे गुण धरले जातील. 

3. सुपर-6 मध्ये प्रत्येक संघ किती सामने खेळणार ?

सुपर सिक्समध्ये ग्रुप अ मधील संघाचा सामना ग्रुप ब मधील संघासोबत होणार आहे. ग्रुप स्टेजमध्ये ज्या संघासोबत सामना झाला नाही, त्याच संघासोबत सामना होणार आहे. म्हणजे, प्रत्येक संघाचे तीन तीन सामने होतील. त्यानुसार, गुणतालिकेत बदल होतील. 

उदाहरण, 

झिम्बाब्वेचे तीन सामने श्रीलंका, स्कॉटलँड आणि ओमान यांच्याविरोधात होतील. नेदरलँड आणि वेस्ट इंडिजविरोधात सामना होणार नाही, कारण, साखळीफेरीतच या संघासोबत सामना झाला आहे. तसेच, श्रीलंका संघाचे तीन सामने झिम्बाब्वे, नेदरलँड आणि वेस्ट इंडिज विरोधात होतील. इतर चार संघही आपले 3-3 सामने अशाच पद्धतीने खेळेल.

4. कोणत्या दोन संघांना वर्ल्ड कपचे तिकिट मिळणार ? 

7 जुलैपर्यंत सुपर 6 स्टेजचे सामने रंगणार आहे. अखेरचा सामना हरारे येथे श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यादरम्यान होणार आहे. सात जुलैनंतर गुणतालिकेत आघाडीवर असणारे दोन संघामध्ये फायनल होणार आहे. 9 जुलै रोजी फायनलचा थरार होणार आहे. हे दोन संघ भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी पात्र होतील. 

5. वर्ल्ड कपमध्ये पोहचणारा संघ कोणत्या संघासोबत लढणार?

क्वालिफायरचा अंतिम सामना जिंकणारा संघ विश्वचषकात  क्वालिफायर-1 संघ म्हणून प्रवेश करेल तर पराभूत संघ क्वालिफायर-2 म्हणून खेळेल. क्वालिफायर-1 संघाचा पहिला सामना 6 ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये पाकिस्तानसोबत होणार आहे. तर क्वालिफायर-2 चा पहिला सामना 7 ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये दक्षिण आफ्रिकाविरोधात होणार आहे. क्वालिफायर – 1 चा भारताविरोधातील सामना 11 नोव्हेंबर रोजी तर क्वालिफायर – 2 चा सामना 2 नोव्हेंबर रोजी होणार आहे.  

आणखी वाचा : 

Round-robin Format : राउंड रॉबिन पद्धतीने होणार यंदाचा विश्वचषक, जाणून घ्या या फॉर्मेटबद्दल संपूर्ण माहिती

World Cup 2023 : विश्वचषकाचे 10 सामने महाराष्ट्रात, भारताचे दोन सामने मुंबई-पुण्यात होणार, पाहा सविस्तर माहिती

Team India World Cup Schedule : भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियासोबत, पाहा टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक

World Cup 2023 : विश्वचषकाचे वेळापत्रक एका क्लिकवर, पाहा कोणत्या मैदानावर रंगणार सामने

पाकिस्तानला झटका, अहमदाबादच्याच मैदानावर रंगणार भारत-पाकिस्तानचा थरार

ICC World Cup 2023 Schedule : विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत रंगणार थरार!

ICC Cricket WC 2023: विराट कोहलीसाठी विश्वचषक जिंका – वीरेंद्र सेहवाग

[ad_2]

Related posts