59 वर्षांपूर्वीचा तो भीषण अपघात! जेव्हा संपूर्ण ट्रेनच समुद्रात बुडाली, अख्खं स्टेशनच झालं होतं गायब; अंगावर शहारा आणणारी घटना

( प्रगत भारत । pragatbharat.com)

1964 Train Accident: ओदिशाच्या (Odisha) बालासोर जिल्ह्यात शालीमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromandel Shalimar Express), बंगळुरु हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस (Yesvantpur-Howrah Superfast) आणि मालगाडी यांच्यात धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. अपघातात तब्बल 260 हून अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून तब्बल 900 जण जखमी झाले आहेत. यानंतर संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या अपघाताने जुन्या एका रेल्वे अपघाताच्या आठवणी जाग्या केल्या आहेत, जी वाचल्यानंतर तुमच्या अंगावर काटा उभा राहील.

15 डिसेंबर 1964 रोजी हवामान विभागाने दक्षिण अंदमानात तयार होणाऱ्या एका भीषण चक्रीवादळाचा इशारा दिला होता. यानंतर वातावरण अचानक बदल झाला आणि तुफान पावसाने हजेरी लावली. 21 डिसेंबरपर्यंत हवामान प्रचंड बिघडलं होतं आणि भयानक रुप धारण केलं होतं. यानंतर 22 डिसेंबर 1964 रोजी चक्रीवादळाने श्रीलंकेतून भारताकडे आपला रोख वळवला. हे चक्रीवादळ ताशी 110 किमीच्या वेगाने भारताच्या दिशेने घोंगावत होतं. 

यादरम्यान हे चक्रीवादळाने तामिळनाडूच्या पंबन आयलँडला धडक दिल्यानंतर तब्बल ताशी 280 किमीच्या वेगाने नॉर्थ वेस्टच्या दिशेने प्रवास करु लागलं. या चक्रीवादळामुळे लोकांमध्ये हाहाकार माजला होता. लोकांमध्ये भीतीचं वातावरण असतानाच 22 डिसेंबर 1964 चा तो दिवस उगवला. 

संध्याकाळचे 6 वाजले होते. तामिळना़डूमधील पंबन आयलँडच्या धनुषकोडी रेल्वे स्थानकावर नेहमीप्रमाणे लगबग सुरु होती. स्टेशन मास्तर आर सुंदरराज वादळ आणि पावसात आपलं कर्तव्य बजावून घऱी परतले होते. 

रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पंबन येथून धनुषकोडीला जाणारी प्रवासी ट्रेन 653 100 प्रवाशांनी घेऊन धनुषकोडी रेल्वे स्थानकाच्या दिशेने निघाली होती. रात्री 11 वाजून 55 मिनिटांनी ट्रेन धनुषकोडी रेल्वे स्थानकावर पोहोचणार इतक्यात चक्रीवादळाने रौद्ररुप धारण केलं. 

तुफान पाऊस आणि वादळामुळे सिग्नल यंत्रणा बिघडली होती. यानंतर लोको पायलटने काही ट्रेन काळी वेळासाठी धनुषकोडी रेल्वे स्थानकावर रोखली. फार वेळ वाट पाहिल्यानंतरही सिग्नल मिळाला नाही तेव्हा लोको पायलटने जोखीम उचलत वादळातच ट्रेन पुढे नेली. 

200 प्रवासी ठार

ट्रेन समुद्रावर उभारण्यात आलेल्या पंबन ब्रीजवरुन धीम्या गतीने पुढे जात होती. याचवेळी समुद्राच्या लाटा जोरात उसळू लागल्या होत्या. अचानक लाटांनी इतकं रौद्ररुप धारण केलं की, 6 डब्यांमधील 100 प्रवासी आणि 5 रेल्वे कर्मचारी समुद्रात बुडाले. ट्रेनमध्ये एकूण 200 प्रवासी होते असं सांगितलं जातं. याचं कारण अनेक लोक विनातिकीट प्रवास करत होते. ट्रेनमधील सर्व प्रवासी या दुर्घटनेत ठार झाले होते. हे चक्रीवादळ त्यावेळी भारतात आलेल्या सर्वात धोकादायक वादळांपैकी होतं.

ही दुर्घटना किती भयानाक होती याचा अंदाज यावरुनच लावला जाऊ शकतो की, धनुषकोडी रेल्वे स्थानकाची एकही खूण त्यानंतर उरली नाही. या चक्रीवादळात एकूण 1500 ते 2000 लोकांचा मृत्यू झाला होता. फक्त धनुषकोडीत 100 लोक मारले गेले होते.  

Related posts