Devendra Fadnavis Criticizes Uddhav Thackeray Reading Ten Sentences From Sharad Pawar Book Lok Maze Sangat

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजीनाम्यावरुन जोरदार टोलेबाजी केली आहे. यासोबतच महाविकास आघाडी सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. शरद पवार यांनी दिलेल्या राजीनाम्यावरुन त्यांनी जोरदार टीका केली आहे, ते म्हणाले की, राज्यात टीआरपी कसा मिळवायचा याचं प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे.मीच माझा राजीनामा माझ्या पक्षाकडे देतो. त्यानंतर पक्ष राजीनाम्यावर आक्रोश तयार करेल. त्यावर ठराव करेल. त्यानंतर मीच माझा राजीनामा परत घेऊन आपल्या स्थानावर परत येईल, असा सगळा गोंधळ शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी केला. राजीनामा देतो म्हणणं आणि राजीनामा देणं, यातील फरक काय आहे, हे शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलं, असा टोलाही त्यांनी पवारांना लगावला.

मविआ सरकारवर टीका करताना ते म्हणाले की,  आम्ही भाकरी फिरवत नाही गरिबांच्या भाकरीची चिंता करतो. सध्या सगळीकडे भाकरी फिरवण्याची चर्चा आहे. त्यातील एक पक्ष भाकरी फिरवतात दुसरा भाकरीचे तुकडे करतात आणि तिसरा पक्ष पूर्ण भाकरी हिसकावून घेतो. फक्त भाजपच गरिबांच्या भाकरीची चिंता करते, असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. 

लोक माझे सांगाची या पुस्ताकावरुनदेखील त्यांनी ठाकरे आणि पवारांवर निशाणा साधला आहे. या पुस्तकात शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात काय़ लिहिलं आहे,  हे देवेंद्र फडणवीसांनी भर बैठकीत वाचून दाखवलं आहे आणि आम्ही करत असलेले आरोप खरे असल्याचं ते म्हणाले आहेत. 

 

‘लोक माझे सांगाती’ पुस्तकात काय लिहिलं आहे?

1. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या संवादातील सहजता उद्धव ठाकरे यांंच्या संवादात नव्हती. 
2.  उद्धव ठाकरे यांना राज्यातील घडामोडींची माहिती नसायची जी मुख्यमंत्र्यांना असायला हवी.
3. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्यावर शिवसेनेत उद्रेक होईल, याची कल्पना आम्हाला नव्हती. 
4. कधी, कुठे, काय घडेल याचा अंदाज घेण्याची क्षमता उद्धव ठाकरेंकडे नव्हती.
5.  घडामोडींनुसार कोणती पावलं उचलायची या राजकीय चातुर्यांची कमतरता जाणवत होती. 
6. राज्यात सगळं घडत होतं हे त्यांना टाळता आलं नाही आणि मविआ सरकार कोसळताना पहिल्याच टप्प्यात त्यांनी माघार घेतली होती. 
7. उद्धव ठाकरे ऑनलाईन प्रशासनाच्या संपर्कात होते मात्र अजित पवार आणि राजेश टोपे हे ग्राऊंडवर उतरुन काम करत होते. 
8. उद्धव ठाकरेंचं दोन वेळाच मंत्रालयात जाणं पचनी पडणारं नव्हतं.  

पवारांचे आभारी आहोत: फडणवीस

हे सगळं पवार यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकात लिहिले आहे आणि हेच सगळे आरोप आम्ही महाविकास आघाडीचं सरकार असताना करत होतो. त्यामुळे पवारांनीच हे लिहिल्यामुळे आम्ही त्यांचे आभार मानतो म्हणत फडणवीसांनी पवारांना आणि उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे. 

[ad_2]

Related posts