Prithvi Shaw Big Decision to Play for England Northamptonshire in County Cricket; पृथ्वी शॉचा मोठा निर्णय, भारत सोडून आता कोणत्या संघाकडून खेळणार जाणून घ्या

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : पृथ्वी शॉ याला आता आपल्याला भारतीय संघात स्थान मिळणार नाही, हे समजले आहे. त्यामुळे आता पृथ्वीने एक मोठा निर्णय घेतला आहे. पृथ्वी आता भारत सोडून एका दुसऱ्याच देशात खेळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

पृथ्वी हा भारताचा विश्वविजेता कर्णधार आहे, त्याने भारताना १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकवून दिला होता. त्यानंतर पृथ्वीला भारतीय संघात स्थानही देण्यात आले होते. पण ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात एक अशी गोष्ट घडली की, त्यानंतर त्याला भारतीय संघातून बाहेर करण्यात आले. त्यानंतर पृथ्वीने बऱ्याचदा दमदार कामगिरी केली खरी, पण तरीही त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले नाही. आता आपल्याला भारतीय संघात स्थान मिळणाक नाही, हे पृथ्वीला बहुदा समजले असावे, त्यामुळे आता पृथ्वीने भारताकडून संधी मिळणार नाही हे समजताच आता दुसऱ्या देशाकडे मोर्चा वळवला आहे.

आयपीएलपूर्वी पृथ्वीचे सपना गिल प्रकरण चांगलेच गाजले होते. या गोष्टीचा परीणाम त्याच्या कामगिरीवर झाला. पृथ्वीला या आयपीएलमध्ये स्वत: ला पुन्हा सिद्ध करायची चांगली संधी होती. पण त्यामध्ये तो अपयशी ठरला. या आयपीएलपूर्वी पृथ्वीचा एका हॉटेलमध्ये जोरदार राडा झाला होता. त्याचता परीणाम त्याच्या खेळावर झाल्याचे पाहायला मिळाले. पण आयपीएलमध्ये अपयशी ठरल्यावर त्याला भारतीय संघात स्थान मिळवता आले नाही. त्यामुळे आता आपल्याला भारतीय संघाचे दार उघडणार नाही, हे त्याला समजले आहे. त्यामुळे आता त्याने इंग्लंडमधील एका संघाकडून खेळायचे ठरवले आहे. पृथ्वीने इंग्लंडमधील Northamptonshire या संघाची करार केला आहे. त्यामुळे आता पृथ्वी नॉटिंगघमशायर संघाबरोबर खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. कदाचित पृथ्वी ३-४ महिने या संघाकडून खेळेल आणि त्यानंतर पुन्हा भारतामध्ये परतेल. कारण त्यानंतर भारतामध्ये रणजी करडंक क्रिकेट स्पर्धा सुरु होणार आहे.

धोनीला वाढदिवसानिमित्त आंध्र प्रदेशच्या चाहत्यांचे खास गिफ्ट; उभारला 41 फुटांचा कटआऊट

पृथ्वीला आता भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागणार आहे. त्यापूर्वी पृथ्वीने आता आपल्या करीअरबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

[ad_2]

Related posts