[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
चांगल्या पचनशक्तीसाठी
पचनशक्ती चांगली असेल तर वजन वाढ आपोआप रोखली जाते. केळ्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे पचनशक्ती सुधारण्यास याची मदत मिळते. केळ्यामध्ये असणारे फायबर पचनशक्तीमध्ये सुधारणा आणून बद्धकोष्ठता रोखण्याचे काम करते.
शरीरातील उर्जा वाढविण्यासाठी
सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी एक केळं खाल्ल्याने दिवसभर शरीरात चांगली उर्जा टिकून राहाते. केळ्यामध्ये उर्जेचे अधिक स्रोत असून कार्बोहायड्रेटदेखील यामध्ये अधिक प्रमाणात आढळते. त्यामुळे पोट भरल्यासारखे राहते आणि शरीरातील उर्जा टिकून राहाते.
(वाचा – वजन वाढण्यासह येत असेल अति घाम तर मृत्यूच्या जवळ जाणाऱ्या गंभीर आजाराचे आहेत हे ५ संकेत)
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
केळ्यामध्ये कमी कॅलरी असून वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. सकाळी उपाशीपोटी केळं खाल्ल्याने पोट भरलेले राहाते. यातील फायबर अधिक भूक लागू देत नाही. याशिवाय केळ्याची स्मूदीदेखील तुम्ही सकाळी पिऊ शकता. नैसर्गिक साखरेचा स्रोत यामध्ये असल्याने वेगळी साखर घालायची गरज भासत नाही.
(वाचा – दाताच्या पिवळेपणापासून ते तोंडाच्या दुर्गंधीपर्यंत गुणकारी ठरेल तुरटी, असा करा सोप्या पद्धतीने वापर)
रक्तातील साखर कमी करण्यासाठी
डायबिटीस असणाऱ्या रूग्णांनी केळं खाऊ नये असं अनेक जण सांगतात मात्र असं अजिबात नाही. Medicinenet ने दिलेल्या अहवालानुसार असं अजिबात नाही. केळ्यामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट अधिक प्रमाणात असते, जे रक्तातील साखर कमी करण्यासाठी मदत करतात. रक्तातील साखरेची पातळी कमी करून साखर नियंत्रणात ठेवण्यासही याची मदत मिळते.
(वाचा – २०० किलो वजन असणाऱ्या कोरिओग्राफर गणेश आचार्यने कसे केले ९८ किलो वजन कमी, प्रवास आहे प्रेरणादायी)
प्रतिकारशक्ती मजबूत बनविण्यासाठी
केळ्यामध्ये विटामिन सी चे अधिक प्रमाणात स्रोत आढळते. विटामिन सी हे प्रतिकारशक्ती मजबूत बनविण्यासाठी याचा अधिक उपयोग होतो. जर प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर केळ्याचा रोज नाश्त्यामध्ये समावेश करून घ्यावा.
चांगल्या हृदय स्वास्थ्यासाठी
केळ्यामध्ये असणारे पोटॅशियम हे रक्तदाब कमी करून हृदयाचे आरोग्य अधिक चांगले करण्यास मदत करते. नियमित केळं खाल्ल्याने आरोग्य चांगले राहून हृदय रोगापासूनही दूर राहण्यास मदत मिळते.
मूड चांगला करण्यासाठी
केळ्यामध्ये ट्रिप्टोफिन नावाचे एक अमिनो अॅसिड आढळते. यामुळे मूड अधिक चांगला होतो आणि तणाव कमी करण्यासाठी याचा फायदा मिळतो. सकाळी उपाशीपोटी केळं खाल्ल्याने मूड चांगला होण्यास मदत मिळते हे सिद्ध झाले आहे.
संदर्भ
https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/1395467/
https://www.medicinenet.com/are_bananas_good_for_diabetes/article.htm
[ad_2]