स्केटिंग करताना हिमनदीत जाऊन कोसळला; थरकाप Body Camera मध्ये झाला कैद

( प्रगत भारत । pragatbharat.com)

सोशल मीडिया म्हटलं, तर तिथे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. यातील काही व्हिडीओ मनोरंजनाचे असतात तर काही प्रबोधन करणारे असता. यातील काही व्हिडीओ हे धाडसी स्टंट करताना रेकॉर्ड केलेले असतात. हे व्हिडीओ अंगाचा थरकाप उडवणारे असता. दरम्यान असाच काहीसा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही वेळासाठी तुमच्या ह्रदयाचे ठोके थांबतील. कारण या व्हिडीओत बर्फावर स्केटिंग करणाता तरुण थेट हिमनदीत जाऊन कोसळताना दिसत आहे. 

तरुणाई म्हटलं की आव्हानात्मक गोष्टी करायला फार आवडतं. बाईक रायडिंग, घोडेस्वारी किंवा मग बर्फावर वेगाने स्केटिंग करणं असो…तरुणांना आयुष्याचा आनंद घेताना अशा गोष्टी करण्याचा मोह आवरत नाही. त्यातही सध्या सोशल मीडियाचा जमाना असल्याने तरुण सर्व गोष्टी रेकॉर्ड करत असतात. 

व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक तरुण शरिरावर कॅमेरा लावून आईस स्केटिंग करताना दिसत आहे. पण या व्हिडीओत जे कैद झालं आहे, तो फार भीतीदायक आहे. तरुण चांगल्या प्रकारे स्केटिंग करत असतानाच अचानक एका हिमनदीच्या फटीत जाऊन कोसळतो. 

व्हिडीओ तरुण जणू काही बर्फाच्या धबधब्यात वाहून चालला आहे असं दिसत आहे. तरुण फार खोलपर्यंत जाऊन कोसळतो. पण सुदैवाने एका जागी स्केट्स अडकल्याने तो वाचतो. यावेळी ता लगेच हातातील ग्लोव्ह्ज काढताना दिसत आहे. यानंतर मात्र व्हिडीओ संपत आहे. 

@uncommon_news या इंस्टाग्राम अकाऊंटला हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या पेजवर नेहमीच असे आश्चर्यकारक आणि अंगावर काटा आणणारे व्हिडीओ शेअर करत असतात. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन लिहिण्यात आलं आहे, ‘सुदैवाने हा तरुण आपल्या ग्रुपसह येथे पोहोचला होता. या ग्रुपने त्याला वाचवलं आहे.’

पण जर तुम्ही व्हिडीओ पाहिलात तर तरुण तरुण खोलपर्यंत खाली जाऊन कोसळताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तरुण जिवंत राहिला असेल की नाही अशी शंका सतावते. 

या व्हिडीओला 45 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका युजरने, यामुळेच मी अशा धोकादायक अॅडव्हेंचरपासून दूर राहतो असं लिहिलं आहे. तर एकाने, इतक्या धोकादायक ठिकाणी पडल्यानंतरही तो वाचला याचं आश्चर्य वाटत असल्याचं म्हटलं आहे. 

Related posts