Ajit pawar set to open new party office in mumbai

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) दावा केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस आमचीच, पक्ष आणि चिन्ह आमच्याबरोबर आहे असं म्हणत अजित पवारांनी (Ajit Pawar) थेट शरद पवारांना (Sharad Pawar) आव्हान दिलंय.

मात्र त्याचवेळी शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, हे विसरलात का, असा प्रश्नही अजित पवारांनी या पत्रकार परिषदेत केला.

आता अजित पवार यांनी पक्षाचं नवं कार्यालय देखील घेतलं आहे. मंत्रालय समोर A/5 बंगला अजित पवारांचं आता नवं कार्यालय असेल. मंगळवारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाचं (New Party Office) मुंबईत उदघाटन होणार आहे. दुपारी एक वाजता अजित पवार आणि प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत या कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे. 

मुंबईच्या चर्चगेटमध्ये असलेलं वाय बी चव्हाण सेंटर महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्र मानलं जातं. 

आता व्हाय बी चव्हाण सेंटरपासून जवळच अजित पवारांचं नवं पक्ष कार्यालय असणार आहे. शरद पवार यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यापासून त्यानंतर घडलेल्या सर्व घडामोडींचा साक्षीदार हे वायबी चव्हाण सेंटर आहे. 

[ad_2]

Related posts