Delhi Metro Couple Fight: खचाखच भरलेल्या मेट्रोमध्ये गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला धु धु धुतलं, पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Delhi Metro Viral Video: गेल्या अनेक वर्षात राजधानी दिल्लीला अनोखी ओळख मिळालीये ती मेट्रोमुळे. मेट्रो (Delhi Metro) सध्या दिल्लीसाठी लाईफलाईन झाल्याचं पहायला मिळतंय. दिल्ली मेट्रो सध्या पिकनीट स्पॉट झाल्याचं दिसतंय. त्याला कारण मेट्रोमध्ये पहायला मिळणारं एंटरटेनमेंट. दिल्ली मेट्रोमधील अनेक व्हिडिओ (Delhi Metro Couple Fight) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतात. अशातच एका व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलंय.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ (Delhi Metro Viral Video) दिल्ली मेट्रोच्या ब्लू लाईनचा असल्याचं सांगण्यात येत आहे. गर्दीने खचाखच भरलेल्या मेट्रोमध्ये अचानक काही कारणावरून गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडचं भांडण झालं. त्यावेळी शाब्दिक वाद इतका वाढला की, गर्लफ्रेंडला राग अनावर झाला आणि तिने सरळ हात वर केला आणि प्रियकराला कानशिलात लगावली. त्याचा व्हिडिओ (Viral Video) पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

संपूर्ण मारामारीत मुलीच्या बाजूनेच ओरडण्याचे आवाज ऐकू येत होते. प्रियकर पूर्णपणे शांत उभा होता. प्रेयसीने मारलेल्या थप्पडावरही त्याने प्रतिक्रिया दिली नाही, अशी प्रियकराची परिस्थिती. जूबाजूचे लोकही त्यांना भांडताना पाहून थक्क झाले. दोघांच्या भांडणावर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. मात्र, कोणीही त्यांची भांडणं सोडणं सोडवण्याचा प्रयत्न केला नाही.

पाहा Video

जर या व्यक्तीने मुलीला कानाखाली मारली असती, तर मेट्रोमधील प्रत्येकजण महिलेच्या मदतीसाठी उभा राहिला असता. इथं महिलेने कानाखाली मारली, त्यामुळे त्या पुरुषाने काहीतरी चूक केली असावी, असं सर्वांना वाटते. दोन्ही बाबतीत फक्त पुरुषच चुकतात, अशी कमेंट एकाने केली आहे. याशिवाय अनेकांनी मुलाचं कौतूक केलंय. काहीही न बोलता तो शांतपणे उभा होता, यावर देखील अनेकांनी भिन्न प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आणखी वाचा – Delhi Metro मध्ये पोरानं केली करामत; असं काही केलं की.. कानावर विश्वासच बसेना, पाहा Video

दरम्यान, दिल्ली मेट्रो कपलसाठी अश्लील चाळे करण्याचा अड्डा झालाय, त्यामुळे आता दिल्ली पोलीस गस्त घालणार असण्याचं सांगण्यात आलंय.  डीएमआरसीने याप्रकरणी कारवाई करण्यासाठी दिल्ली पोलिसांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर दिल्ली पोलीस (Delhi Police) अॅक्शन मोडवर आली आहे.

Related posts