Rahul Handore Sent To Yerawada Jail In Pune Darshana Pawar Murder Case

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Darshana Pawar Murder Case:  दर्शना पवार हत्या प्रकरणातील आरोपी (Darshana Pawar Murder Case) राहुल हांडोरी याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर हंडोरे याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाकडून न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने हंडोरे याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाकडून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, 18 जून रोजी दर्शना पवार हिची हत्या करण्यात आली होती. याच प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी राहुल हंडोरे याला मुंबईतून अटक केली होती. 

12 जूनला राजगडाच्या पायथ्याला दर्शनाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर 18 जूनला तिचा मृतदेह आढळून आला होता. विवाहास नकार दिल्यानं राजगडावर जाताना त्यांच्यात वादावादी झाली, राग अनावर झाल्यानं राहुलनं आधी तिच्या गळ्यावर कंपासमधील कटरनं तीन ते चार वार केले, त्यानंतर तिच्या गळ्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. नंतर त्यानं बाजूचा दगड उचलून तिच्या डोक्यावर जीवघेणा वार केला. दर्शनाची हत्या करण्याचा माझा हेतू नव्हता, रागाच्या भरात माझ्या हातून हा गुन्हा घडला, असा दावा राहुलनं पोलिसांच्या जबाबात केला. दर्शनाचं लग्न ठरलेलं कळताच राहुल हंडोरे अस्वस्थ झाला त्याने दर्शनाच्या घरच्यांना सांगितलं की, थोडी वाट पहा मी देखील परीक्षेत यशस्वी होईल आणि मग मी दर्शनाशी लग्न करेल. पण घरच्यांनी राहुलला दाद दिली नाही. सत्कारासाठी दर्शना पुण्यात आली तेव्हा राहुल तिला ट्रेकिंगच्या बहाण्याने राजगडावर घेऊन गेला आणि तिथेच तिची हत्या केली.

Darshana Pawar Murder Case : हत्या केल्याचं समोर अन् पाच पथकांचा शोध, मुंबईत जेरबंद

18 जूनला दर्शना पवार हिचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर ती राहुलसोबत ट्रेकला गेल्याचं समजल्यावर राहुलवर संशय व्यक्त केला जात होता. त्यानंतर 19 जूनला दर्शनाच्या पोस्टमार्टममधून दर्शनाची हत्या झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करायला सुरुवात झाली. हत्या केल्यानंतर राहुल पसार होता. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी वाढला. त्याच्या आई वडिलांकडे देखील चौकशी केली होती. त्यानंतर पोलिसांनी पाच पथकं नेमली. त्यांनी नाशिक, मुंबई, सिन्नर, पुणे या ठिकाणी पथकं तपासासाठी पाठवण्यात आली होती. सलग चार दिवस या प्रकरणाचा शोध सुरु होता. त्याचं लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला असता पश्चिम बंगालमध्येही त्याचं लोकेशन पोलिसांना सापडलं होतं. या दरम्यान त्याने कुटुंबियांकडूनही पैसे मागवले होते. त्यांनीदेखील टप्प्याटप्प्याने पैसे पाठवले होते. पोलिसांना राहुलचा तपास करण्यासाठी राहुलच्या कुटुंबियांनीदेखील सहकार्य केलं होतं. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

‘औरंगजेबाला मी आदर्श मानतो’; राष्ट्रवादीतून बीआरएसमध्ये आलेल्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

[ad_2]

Related posts