Pune Crime News Pune Teacher Faces Charges For Abusing And Assaulting Student

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Crime news :  शिक्षणाच्या माहेरघरात शिक्षणासंदर्भातील अनेक बातम्या (Pune Crime news) समोर येतात. कधी फी न भरल्यामुळे मुलांना शाळेबाहेर उभं ठेवल्याच्या घटना समोर येतात तर कधी शिक्षकाने प्रवेशासाठी लाच घेतल्याच्या घटना समोर येतात आता मात्र शिक्षकानेच भाषेची पातळी सोडल्याचा प्रकार समोर आला आहे.  शिक्षकाने विद्यार्थ्याला घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली आहे. या प्रकरणी शिक्षकावर गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. 

मनोज श्रीराम यावलकर (52, रा. चिंचवड, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोथरूड पोलिसांनी संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 2 जुलै रोजी कोथरूड येथील भुसारी कॉलनीत घडली. या प्रकरणी पालकांनी तक्रार दाखल केली आहे.  तक्रारीनुसार, यावलकर यांचा 12 वर्षांचा मुलगा आरोपी शिक्षकाच्या वर्गात होता. मधल्या सुट्टीच्या दरम्यान, मुलगा बाथरूम वापरण्यासाठी गेला आणि त्याच्या मित्राने खोड्या म्हणून बाहेरून दरवाजा बंद केला. जेव्हा मुलाने बाहेर निघण्यासाठी दरवाजा ठोठावला तेव्हा शिक्षकाने अयोग्य वर्तन दाखवत शाब्दिक शिवीगाळ करून उत्तर दिलं की, “मी तुला काही शिष्टाचार शिकवतो. तू हुशार नाहीस, उलट झोपलेला असतोस.” विद्यार्थ्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्याची धमकी देत ​​शिक्षकाने रॉड मारला आणि त्याच्या हातावर वार केले. त्यावेळी मुलाच्या हाताला दुखापत झाली आणि मुलगा घाबरलेल्या अवस्थेत बाहेर निघाला. त्याने हा सगळा प्रकार घरी येऊन पालकांना सांगितली. आपल्या मुलाच्या आरोग्याबद्दल चिंतेत असलेल्या पालकांनी शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी तातडीने पोलिस स्टेशन गाठले. या प्रकरणाचा  संपूर्ण तपास पोलीस करत आहे.

Pune Crime news : शिक्षकांवर विश्वास कसा ठेवायचा?

यापूर्वी  शिक्षकाने विद्यार्थीनी वर्गात एकटी असताना अश्लील कृत्य केल्याची घटना घडली होती. पुण्यातील  चंदननगर परिसरातील एका नामांकित शाळेत ही घटना घडली होती. शिक्षणासाठी पालक शिक्षकांवर विश्वास ठेवून आपले पाल्य शिक्षकांकडे किंवा शाळेत पाठवतात. मात्र शिक्षकानेच असं कृत्य केल्याने मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे आणि शिवाय पालकंही शिक्षकाच्या कृत्यावर संताप व्यक्त करत आहेत. पीडित मुलगी चंदननगर परिसरातील एका शाळेत शिकते. शिक्षक हे तिचे कार्यानुभव विषयाचे शिक्षक होते. मुलगी नामांकित शाळेतील वर्गात एकटीच होती. हे पाहून शिक्षकाने फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. शिक्षकाने मुलीबरोबर अश्लील चाळे करायला सुरुवात केली. त्यानंतर तिच्याशी जवळीकदेखील साधण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असं कृत्य केलं होतं. हा सगळा प्रकार मुलीने घरी येऊन सांगितला घरच्यांनी थेट पोलिसांत धाव घेतली आणि पोलिसांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी शिक्षकावर गुन्हा दाखल केला होता.

[ad_2]

Related posts