Big Shock To Mumbai Indians After RCB Beat SRH In IPL 2023 ; आरसीबीच्या विजयासह मुंबई इंडियन्सला बसला मोठा धक्का

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

हैदराबाद : आरसीबीने हैदराबादच्या संघावर दणदणीत विजय साकारला आणि या विजयासह त्यांनी आपले प्ले ऑफमधील स्थान मिळवण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे. पण या विजयानंतर आता मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. कोहलीच्या शतकामुळेच आरसीबीला विजय मिळवता आला आणि त्याने रोहित शर्माला पुन्हा एकदा चिंतेत टाकले.या सामन्यापूर्वी आरसीबीच्या संघाने १२ सामने खेळले होते. या १२ सामन्यांमध्ये त्यांनी ६ विजय मिळवले होते, तर ६ सामन्यांमध्ये ते पराभूत झाले होते. त्यामुळे ६ सामन्यांतील विजयासह त्यांनी १२ गुण कमावले होते. त्यामुळे आरसीबीचा संघ हा पाचव्या स्थानावर होता. हैदराबादचा सामना आरसीबीने जिंकला आणि त्यांनी दोन गुण मिळवले. त्यामुळे आता आरसीबीचे १४ गुण झाले आहेत. गुणतालिकेत मुंबईचा संघ हा चौथ्या स्थानावर होता आणि त्यांचेही १४ गुण आहेत. पण या दोघांमध्ये फरक आहे तो फक्त रनरेटचा. मुंबईचा रनरेट हा आरसीबीपेक्षा कमी आहे आणि याचा फायदा आरसीबीला झाला आहे. कारण गुण समान असले तरी रनरेटच्या जोरावर त्यांनी चौथे स्थान पटकावले आहे. त्यामुळे मुंबईच्या संघाची पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. मुंबईचा संघ हा टॉप-४ मधून बाहेर पडला आहे. प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी अव्वल चार संघ पाहिले जातात आणि आरसीबी आता अव्वल चारमध्ये पोहोचला आहे. दुसरीकडे मुंबई मात्र अव्वल चार संघांमधून बाहेर पडला आहे. त्यामुळे मुंबईसाठी ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे आता जर आरसीबीने पुढचा सामना जिंकला तर त्यांचे १६ गुण होतील आणि त्यांना प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची संधी असेल. त्यामुळे या एका सामन्यामुळे मुंबईला मोठा धक्का बसला आहे.

मुंबईत सामना जिंकला आणि बंगळुरुत फटाके फुटले; स्वतःसाठी जमलं नाही ते आरसीबीसाठी केलं


आता गुणतालिकेत गुजरातचा संघ हा प्ले ऑफमध्ये पोहोचला आहे. दिल्ली आणि हैदाराबाद बाहेर गेले आहेत. त्यामुळे आता सात संघ तीन स्थानांसाठी लढत आहेत. त्यामुळे आता मुंबई, आरसीबी, पंजाब, केकेआर, राजस्थान, लखनौ, चेन्नई यांच्यापैकी कोणते संघ प्ले ऑफमध्ये पोहोचतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल आणि त्याची उत्सुकताही असेल.

[ad_2]

Related posts