Iqoo-neo-7-pro-5g Smartphone-launched-in-india-know-price Feature And More Details Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

iQOO Neo 7 Pro 5G Smartphone : नुकताच चिनी ब्रँड निर्माता कंपनी iQOO ने कमी किमतीत नवीन स्मार्टफोन iQOO Neo 7 Pro 5G भारतात लाँच केला आहे. हा एक गेमिंग स्मार्टफोन असून या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 35,000 रुपयांपेक्षाही कमी ठेवण्यात आली असून यामध्ये अनेक प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत ते जाणून घेऊयात. 

iQOO Neo 7 Pro 5G स्पेसिफिकेशन 

या स्मार्टफोनमध्ये कर्व्ड बॅक पॅनल देण्यात आला आहे. स्मार्टफोनला मेटल फ्रेम देण्यात आली आहे. फिअरलेस फ्लेम आणि डार्क स्टॉर्म या दोन कलर ऑप्शनमध्ये हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. फ्लेम कलर व्हेरियंटमध्ये लेदर बॅकचा वापर करण्यात आला आहे. तर डार्क स्टॉर्ममध्ये एजी ग्लास कोटेड बॅकचा वापर करण्यात आला आहे.

iQOO Neo 7 Pro 5G फिचर्स 

iQOO Neo 7 Pro 5G या स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच E5 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह 1,500 nits चा ब्राईटनेस आहे. हा स्मार्टफोन HDR10+ सपोर्टसह येतो. या स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर सपोर्ट देण्यात आला आहे.

iQOO Neo 7 Pro 5G वैशिष्ट्य

या स्मार्टफोनमध्ये पॉवरफुल Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. पहिल्यांदाच एका स्मार्टफोनमध्ये दोन चिपसेट देण्यात आले आहेत. एक चिपसेट खास गेमिंगसाठी डिझाईन केलेला आहे. या स्मार्टफोनमध्ये LPDDR5 रॅम आणि UFS 3.1 स्टोरेज सपोर्टसह येतो.

iQOO Neo 7 Pro 5G कॅमेरा 

iQOO Neo 7 Pro 5G या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे, ज्यामुळे हा स्मार्टफोन केवळ काही मिनिटांतच 50 चार्ज होऊ शकतो असा कंपनीने दावा केला आहे. स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा मुख्य कॅमेरा 50MP आहे, जो OIS सपोर्टसह येतो. याशिवाय 8MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्स देण्यात आली आहे. तसेच 2MP मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या फ्रंटमध्ये 16MP कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

iQOO Neo 7 Pro 5G किंमत किती?

IQ Neo 7 Pro 5G स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज ऑप्शनची किंमत 35,999 आहे. पण प्री बुकिंग आणि बँक ऑफरसह स्मार्टफोन 33,999 रुपयांना खरेदी करता येऊ शकतो. 

महत्त्वाच्या बातम्या : 

6G Network: 5 जी ची प्रतीक्षा असतानाच आता 6 जी बाबत मोठी बातमी! केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची महत्त्वाची घोषणा

[ad_2]

Related posts