Maharashtra NCP Political Crisis Ncp Meeting Sharad Pawar Ajit Pawar Calls Supporters

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maharashtra NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Nationalist Congress Party) अजितदादांमुळे (Ajit Pawar) मोठं रामायण घडलंय. आता त्याच्या महाभारताची सुरूवात आज होणार आहे. कारण, एकीकडे अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची आज सकाळी 11 वाजता बैठक बोलवली आहे. तर दुसरीकडे शरद पवार (Sharad Pawar) यांनीही राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक दुपारी 1 वाजता आयोजित केली आहे. तसे व्हिपही बजावण्यात आले आहेत. मात्र दोघांपैकी कुणाच्या बैठकीला जायचं, यावरून राष्ट्रवादीचे आमदार चांगलेच कात्रीत सापडले आहेत. अजित पवार यांनी वांद्रे येथील एमईटी कॉलेजमध्ये बैठक बोलवली आहे, त्यासाठी प्रतोद अनिल पाटील यांनी व्हिप जारी केला आहे. तर शरद पवार यांनी वायबी सेंटरमध्ये बैठक बोलवली आहे. त्यासाठी प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी व्हिप जारी केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कोणत्या बैठकीला जाणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. 

कोणाच्या बैठकीला जायचं? आमदार, खासदार कात्रीत 

आजचा दिवस महाराष्ट्रातील राजयकीय उलथापालथी दरम्यान अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या सुरू असलेल्या राजकीय गोंधळात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं आज शक्तिप्रदर्शन असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची (अजित पवार गट आणि शरद पवार गट ) 5 जुलै रोजी महत्त्वाची बैठक आहे. अजित पवार यांनी पक्षाच्या आमदार-खासदारांची सकाळी 11 वाजता वांद्रे येथील एमईटी कॉलेजमध्ये बैठक बोलावली आहे, तर शरद पवार यांनी दुपारी एक वाजता यंशवंतराव चव्हाण सेंटर येथे सर्व आमदार, खासदार आणि जिल्हा ते तालुका पातळीवरील सर्व स्तरातील कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे.

त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत राजकीय लढाईत आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. दोन्ही गटांनी आजच्या सभेची पूर्ण तयारी केली आहे. या बैठकांमधूनच पक्षाचे भवितव्य ठरवलं जाईल, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज एकाच दिवशी दोन्ही गटांकडून बैठक बोलावण्यात आली आहे. आज ज्या गटाच्या बैठकीत सर्वाधिक आमदार, खासदार आणि जिल्हा, तालुका पातळीवरील कार्यकर्ते उपस्थित असतील तोच गट थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा करू शकतो. अशा परिस्थितीत कोणाच्या बैठकीला उपस्थित राहायचं? यावरुन राष्ट्रवादीचे आमदार, खासदारांपुढे पेच निर्माण झाला आहे. 

आमदार, खासदारांना कोणाचं नेतृत्त्व मान्य, आजच्या बैठकांमधून स्पष्ट होणार 

बुधवारी होणाऱ्या या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अधिकृत पत्र जारी केलं आहे. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्हिडीओ जारी करून सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या बैठकीला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, राष्ट्रवादीचे प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनीही आज सर्व आमदारांना पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्याचा व्हीप जारी केला आहे.

दुसरीकडे, शरद पवार यांच्यापासून फारकत घेत, अजित पवार यांना पाठिंबा असलेल्या राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनीही आज वांद्रे येथे होणाऱ्या बैठकीचे अधिकृत पत्र जारी केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, नवनियुक्त कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या बैठकीत सहभागी होण्यासाठी सर्व निवडून आलेले लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा ते तालुका पातळीवरील पक्षाच्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं आहे.  

शरद पवार यांच्या फोटोवरूनही वाद

राष्ट्रवादीच्या राजकारणात दोन्ही गट वर्चस्व दाखवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. शरद पवार यांनी मंगळवारी संध्याकाळी एका हिंदी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना माझा फोटो माझ्या परवानगीनंच वापरावा, असंही सांगितलं आहे. जे माझ्या विचारांच्या विरोधात आहेत, ज्यांच्याशी माझे वैचारिक मतभेद आहेत. त्यांनी माझा फोटो वापरू नये. माझा फोटो कोणी वापरावा हा माझा अधिकार आहे, असं शरद पवार म्हणाले. मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत, त्याच पक्षानं केवळ माझा फोटो वापरू शकतो, इतर कोणीही माझा फोटो वापरू नये. शरद पवारांनी दिलेला हा इशारा अजित पवारांसाठीच होता. 

शपथविधीनंतर अजित पवारांनी त्यांच्या गटातील कार्यकर्त्यांना बॅनरवर शरद पवारांचाही फोटो वापरण्याचे आदेश दिले होते. त्यावर बोलताना शरद पवारांनी सूचक इशारा दिला आहे. 

[ad_2]

Related posts