खळबळजनक! Govt Apps सह खासगी बँकांच्या ग्राहकांची गोपनीय माहिती फेसबुकच्या हाती

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Private Banks sharing personal activities with Facebook: बऱ्याच काळापासून काही संस्था, आस्थापनांकडून गोपनीयतेच्या कराराचा भंग करण्याच्या वृत्तामुळं खळबळ माजल्याचं आपण पाहिलं. मोठमोठ्या शासकीय संस्थांमधूनही नागरिकांच्या गोपनीय माहितीचा सुगावा त्रयस्तांना लागल्याच्या घटनाही आजवर अनेकदा घडल्या. त्यात आता नव्यानं भर पडली असून, एकच खळबळ माजली आहे. सहकारी वाहिनी ZEE NEWS च्या विशेष वृत्तातून समोर आलेलल्या माहितीनुसार नागरिक, युजर्स, ग्राहकांच्या गोपनीय माहितीबाबत धोरणांचं पालन न केल्यामुळं आता काही बड्या खासगी बँका आणि सरकारी अॅप्सचं नाव यात समोर आलं आहे. 

फेसबुकच्या हालचालींवर नजर ठेवली असता लक्षात आलं की… 

फेसबुककडून एखाद्या युजरवर 24*7 नजर ठेवली जात असल्याच्या प्रकरणात डोकावलं असता काही महत्त्वाच्या आणि धक्कादायक गोष्टी समोर आल्या. जिथं AXIS, ICICI आणि कोटक महिंद्रा बँका त्यांच्या ग्राहकांची गोपनीय माहिती आणि त्यांच्या Personal App Activity संदर्भातील माहिती फेसबुकला देत असल्याचं उघड झालं. 

तुम्ही कोणत्या बँकेचं App वापरता? 

आयसीआयसीआय, अॅक्सिस किंवा कोटक महिंद्रा यासोबत तुम्हीही फेसबुकचं अॅप वापरताय का? ICICI चं iMobile Pay, Axis बँकेचं Axis Pay Mobile Invest & UPI आणइ Kotak Mahindra चं 811– Mobile Banking अॅप आणि फेसबुकचं अॅप वापरत असाल तर, Facebook च्या Settings मध्ये जाऊन Off Facebook Activity मध्ये तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळेल. इथं या खासगी बँका त्यांच्या अधिकृत अॅपमधील माहिती आणि सर्व User Activities ची माहिती त्या त्या बँकांचे अॅप वापरतेवेळी फेसबुकला देत असल्याचं स्पष्ट होतंय. 

 

तुम्ही जेव्हा सदरील बँकांचे अॅप वापरता तेव्हा तुम्ही ते नेमके कधी सुरु करता, त्या अॅपवर नेमकं काय Browse करता, कोणाला पैसे देता, कोणाकडून पैसे घेता या आणि अशा अनेक खासगी, गोपनीय कृतींची माहिती सध्या थेट फेसबुकपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळं बँकांच्या अॅपमध्ये दिसणाऱ्या Privacy Policy फक्त दिखावाच आहेत का? हा महत्त्वाचा प्रश्न पुन्हापुन्हा उपस्थित होतो. 

Related posts